नागोठणे (महेंद्र माने) :
चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (सी. के. पी.) समाजाच्या श्री सिद्धीविनायक मंदिरात सी. के. पी. समाज महिला मैत्री ग्रुप आयोजित मंगळवार 04 मार्च रोजी झालेल्या 21 व्या महाआरतीचा बहूमान महिला शक्तीला देण्यात आला. 21 व्या महाआरती निमित्ताने 21 महिलांना आरतीचा मान,21 मोदक,21 दूर्वा अशी संकल्पना मंडळांनी जाहीर केले. त्याला 63 महिलांनी अल्पावधीत भरघोस प्रतिसाद दिल्याने 21 महिलांच्या तीन गटात महाआरती घेण्यात आली. यावेळी नागोठणे शहर, वरवठणे, रोहे, पाली खोपोली येथील महिला वर्ग तसेच विभागातील गणेश भक्तांनी उपस्थित होते.
श्री सिद्धीविनायक मंदिरात दर मंगळवारी रात्री आठ वाजता होत असलेल्या आरतीला मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी महाआरतीचे स्वरूप देण्यात आले. महाआरतीमुळे एकत्र येऊन सामाजिक वातावरण कायम सौहार्दपूर्ण रहावे, एकमेकांमध्ये अधिक सुसंवाद घडावा, तसेच तरुणाई आणि शाळकरी मुलांमध्ये अध्यात्माची जास्तीतजास्त गोडी निर्माण व्हावी हा या महाआरतीमागील मुख्य उद्देश आहे. त्यानंतर दर मंगळवारी महाआरतीला विविध संस्था, संघटना, पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानपूर्वक निमंत्रित देण्यात येत असून पहिली महाआरतीत नागोठणे पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
मंगळवार 04 मार्च रोजी होणारी 21 व्या महाआरतीचा मान महिलांना देऊन होणार्या हटके कार्यक्रमात 21 वी महाआरती,21 महिला,21 मोदक,21 दूर्वा अशी संकल्पना समोर आली. त्याला नागोठणे शहर,वरवठणे,रोहे,पाली खोपोली येथील महिलांनी उदंड प्रतिसाद दिल्याने 63 महिलांना प्रवेश देऊन 21 महिलांचे तीन गट करण्याचा निर्णय मंडळाने घेतल्याची माहिती उदय भिसे व नितिन देशपांडे यांनी दिली. त्यानुसार मंगळवारी झालेल्या महाआरतीत सहभागी झालेल्या 63 महिलांचे मंडळाच्या वतीने श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
या अद् भूत सोहळ्यास नागोठणे शहर व विभागातील गणेश भक्तांनी सहभाग घेतला. सदरील झालेल्या महाआरतीचे विभागात कौतुक होत असून मंडळाला सुभेच्छा देण्यात येत आहेत.
—————————————-
सुंदर नियोजनबद्ध कार्यक्रम —
श्री सिध्दीविनायक मंदिरात झालेल्या महाआरतीचा सोहळा सुंदर रित्या पार पाडला.सर्वांचे एकमताने होणारे सुंदर नियोजन असल्यामुळे कार्यक्रम वेळेवर सुरु होऊन,कुठलाही गोंधळ न होता. निर्विंघ्नपणे पार पडला. मैत्री ग्रुप आणि कार्यकारीणी मंडळ यांनी आम्हाला सहभागी करुन घेत आहात. आपले कार्यक्रमही स्तुत्य असतात. असेच कार्यक्रम भविष्यात होत राहो आणि त्यात आम्हा महिलांना सहभागी होण्याची संधी मिळो,जेणेकरून आम्हाला त्यात आनंद आणि समाधान मिळेल. तसेच महाआरतीत आम्हाला सहभागी करून घेतल्याबद्दल मैत्री ग्रुप,सी.के.पी. समाज आणि आयोजकांना धन्यवाद.
…मंगल जोशी,निलम पट्टेकर,सुबोध पागे, गीतांजली कुलकर्णी, सरीता वाघमारे, मानसी पट्टेकर. सणस मॅडम- पाली, स्वाती दळवी व नेहा शहासने – नागोठणे