191- पेण विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी मोठा राजकीय फेरफार दिसून आला आहे. एकूण 15 उमेदवारांपैकी 3 उमेदवार अपात्र ठरले तर 5 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे आता निवडणुकीच्या अंतिम मैदानात केवळ 7 उमेदवारच शिल्लक राहिले आहेत.
राजकीय पक्षांची रणनीती आणि निर्णयाची पार्श्वभूमी
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या या घटनेमुळे अनेक राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवार आपापली रणनीती पुनर्रचित करताना दिसले आहेत. काही प्रमुख राजकीय पक्षांनी स्थानिक उमेदवारांना आपापल्या गोटात सामावून घेण्याचे प्रयत्न केले, तर काहींनी केवळ एकजुटीच्या धोरणाचा अवलंब करून आपल्या पक्षाच्या उमेदवाराला अधिक बळकटी दिली आहे.
अर्ज मागे घेण्यार्या उमेदवारांची नावं
पल्लवी प्रसाद भोईर, सुरेश नामदेव खैरे, नमिता नंदकुमार म्हात्रे, संजय हिरमण म्हात्रे, दशरथ मोतीराम साळवी यांचा समावेश आहे.
अपात्र उमेदवार
कौसल्या रविंद्र पाटील, नरेश गजानन पाटील, प्रसाद सूर्यकांत वेदक यांचा समावेश आहे.
पात्र उमेदवारांचं पक्ष, नाव व निशाणी
शेकाप तर्फे अतुल म्हात्रे (शिट्टी), भाजपा तर्फे रविंद्र पाटील (कमळ), शिवसेना उबठा तर्फे प्रसाद भोईर (मशाल), बीएसपी तर्फे अनुजा साळवी (हत्ती), वंचित बहीजन आघाडी तर्फे देवेंद्र कोळी (गॅस सिलेंडर), अभिनव भारत पार्टी तर्फे मंगळ पाटील (माईक) आणि अपक्ष उमेदवार विश्र्वास बागुल (इस्त्री) यांचा समावेश आहे.
मतदारांमध्ये उत्सुकता
अर्ज मागे घेतल्यामुळे आता मतदार संघातील मतदारांमध्ये वाढती उत्सुकता पाहायला मिळत आहे. एकूण 7 उमेदवारांमध्ये असली तरी खरी लढत ही शेकापचे उमेदवार अतुल म्हात्रे , भाजपाचे उमेदवार रविंद्र पाटील आणि उबठाचे प्रसाद भोईर यांच्यात असणार आहे. त्यामुळे कोण बाजी मारेल, याची चर्चा प्रत्येक ठिकाणी रंगली आहे. निवडणुकीसाठी प्रचार सुरू असताना हे बदल मतदारांवर कोणता प्रभाव पाडतील, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
निवडणुकीसाठी वाढलेली स्पर्धा
या घटनेमुळे निवडणुकीची स्पर्धा अधिक तगडी झाली आहे. कमी उमेदवार राहिल्याने प्रत्येक उमेदवाराला जास्तीत जास्त मत मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे आगामी काही दिवसांत प्रचारात अधिक जोम आणि चुरस दिसणार आहे. त्याचबरोबर अंतिम निकाल हा 23 नोव्हेंबरला असल्याने नेमकं बाजी कोण मारणार याची वाट पहावी लागणार.
पेण मतदार संघात निवडणुकीसाठी सज्जता
निवडणूक आयोगाने पेण मतदार संघातील सर्व व्यवस्था पार पाडल्या असून, आगामी निवडणुकीसाठी मतदारांमध्ये जागृती मोहिमाही हाती घेतली आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.