नागोठणे ( महेंद्र माने ) :
दि. 16 नोव्हेंबर 2024- भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घर बसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार 191 पेण सुधागड रोहा विधानसभा मतदारसंघातील नागोठणे ग्रामपंचायत हद्दीतील 16 पैकी 15 मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती सहा. मतदान केंद्राध्यक्ष राकेश टेमघरे यांनी दिली.
पेण विधानसभा मतदारसंघातील नागोठणे ग्रामपंचायत हद्दीतील 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 16 पैकी 15 ज्येष्ठ नागरिकांनी घर बसल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
या मतदान केंद्रात गोपनीय पद्धतीने मतदान करण्याची सुविधा पुरविण्यात येऊन संबधित मतदारसंघातील पथक क्रमांक 18 यांनी घेतलेल्या गृह मतदान सुरळीत पार पडण्यासाठी झोनल ऑफिसर शुभदा पाटील,मतदान केंद्राध्यक्ष गणेश विटेकर, सहा.मतदान केंद्राध्यक्ष राकेश टेमघरे यांच्यासह बीओआय किसन शिर्के व भास्कर घाग तसेच पोलिस व पथक कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी ज्येष्ठ नागरिक मतदारांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले.