मुंबई-गोवा महामार्गाचे काम तब्बल 14 वर्षांपासून अपूर्ण आहे, ज्यामुळे कोकणवासीयांना वाहतूक कोंडी, असुविधा आणि सरकारी उदासीनतेचा सामना करावा लागत आहे. कोकणला कॅलिफोर्निया करण्याचे मोठे दावे करणाऱ्या राजकारण्यांनी वारंवार आश्वासने दिली, मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी डिसेंबरपर्यंत महामार्ग पूर्ण होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे कामाची गती अत्यंत मंद आहे. माणगांव, लोणेरे, टेमपाले नागोठणे, आणि कोलाड येथील पूल आजही अर्धवट अवस्थेत आहेत.
रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे स्थानिक व्यवसायांवर गंभीर परिणाम झाला आहे. माणगांव, कोलाड बाजारपेठेत वाहतूक कोंडी कायम असून, महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे माणगांव शहराबाहेरून काढलेल्या पर्यायी रस्त्याचे काम आजही अपूर्ण अवस्थेत आहे.
सरकार आणि कंत्राटदारांची पळपुटी भूमिका पाहता कोकणवासीयांना अजूनही प्रतीक्षाच भोगावी लागेल, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. 14 वर्षांनंतरही हा महामार्ग पूर्ण कधी होईल? की कोकणवासीयांची फसवणूक अशीच सुरू राहणार?
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.