12 वीची परीक्षा दिलेल्या आणि 12 वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी स्वदेस फाउंडेशनतर्फे शिष्यवृत्तीची योजना

Swadesh Foundation
पोलादपूर (शैलेश पालकर) :
स्वदेस फाउंडेशनतर्फे 12 वीची परीक्षा दिलेल्या आणि 12 वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची योजना जाहिर करण्यात आल्याची माहिती स्वदेसचे प्रकल्पाधिकारी तुषार इनामदार यांनी दिली.
रॉनी स्क्रूवाला व झरीना स्क्रूवाला यांच्या स्वदेस फाउंडेशनच्या वतीने रायगड जिल्ह्यामधील माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर व सुधागड तालुक्यामध्ये ग्रामीण सक्षमीकरणाचे प्रकल्प गाव विकास समितीच्या सहकार्यांमधून राबविण्यात येत आहेत. स्वदेस शिष्यवृत्ती योजना हि त्या उपक्रमाचा एक भाग आहे. शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आत्तापर्यंत 777 गरीब व होतकरू विद्यार्थ्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण करून चांगल्या प्रकारची नोकरी मिळवलेली आहे आणि काही विद्यार्थी चांगल्या पध्दतीने शिक्षण घेत आहेत.
शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी पात्रता व अटींबाबत तुषार इनामदार यांनी, विद्यार्थी हा रायगड जिल्ह्यामधील माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर व सुधागड या तालुक्यातील रहिवासी असावा. कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न 8.5 लाखाचे आत असावे.  12 वी आणि पदवी परीक्षेत कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत 60पेक्षा जास्त टक्केवारी असावी. विद्यार्थ्याची उच्च शिक्षण घेण्याची महत्वाकांक्षा असावी, अशी माहिती देताना शिष्यवृत्ती निवड प्रक्रियेसंदर्भात विद्यार्थ्यांने अर्ज हा ऑॅनलाइन पध्दतीने स्वदेस फाउंडेशन ने दिलेल्या क्यू आर कोड स्कॅन स्कॅन करून आपली माहिती भरून 30 एप्रिल 2025पूर्वी पाठवावी. त्यानंतर स्वदेस फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्याच्या दोन मुलाखती घेतल्या जातील. मुलाखतीत पास झालेल्या विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाईल, असे सांगितले.
शिष्यवृत्तीची रक्कम ही विद्यार्थ्याच्या वार्षिक उत्पनानुसार, त्याच्या कॉलेज फी आणि वसतिगृह खर्च याच्या आधारावर दिली जाईल. 12 वी नंतर विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्र-बी ए एम एस, एमबीबीएस, बीडीएस, बीपीटी नर्सिंग, फार्मसी,  वाणिज्य क्षेत्र-सीए, सी एस, बीकॉम इन अकाउंटन्सी, अभियांत्रिकी क्षेत्र -पदवी पदविका व आर्किटेक्चर, कायदा क्षेत्र-एल एल बी, एल एल एम, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनर उच्चशिक्षण कोर्सेसला शिष्यवृत्ती दिली जाईल. उच्च शिक्षण घेण्यासाठी पात्रता परीक्षा, स्पर्धात्मक परीक्षा, यूपीएससी, सैन्यदल व पोलीस पात्रता परीक्षा यासाठी सुध्दा शिष्यवृत्ती देण्यात येते, असेही यावेळी तुषार इनामदार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading