10वी-12वीच्या 2025 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Exam
PEN न्यूज ऑनलाइन टीम :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या दहावी व बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदा परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत लवकर होणार आहेत.
बारावी परीक्षा: 11 फेब्रुवारी 2025 पासून
दहावी परीक्षा: 21 फेब्रुवारी 2025 पासून
या परीक्षांचे सविस्तर अंतिम वेळापत्रक मंडळाच्या “www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध  असून विद्यार्थ्यांनी अंतिम छापील वेळापत्रकानुसारच तयारी करावी.
प्रात्यक्षिक व मूल्यमापन परीक्षा:
बारावी: 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2025
दहावी: 3 ते 20 फेब्रुवारी 2025
बारावी आणि दहावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक :
परीक्षा कालावधी- 12वी (सर्वसाधारण, द्विलक्षी, व्यवसाय अभ्यासक्रम) : लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025- 12वी (प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन, तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा) : 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2025.
10वी लेखी परीक्षा – 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025,    10वी (प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा) – 3 ते 20 फेब्रुवारी 2025

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading