ॲड. आस्वाद पाटील यांची शेकापला सोडचिठठी

ॲड. आस्वाद पाटील यांची शेकापला सोडचिठठी
अलिबाग ( अमुलकुमार जैन ) : 
रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांची भगिनी महाराष्ट्र शासनाच्या मत्सयव्यवसाय विभागाच्या राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचे पुत्र ॲड. आस्वाद पाटील उर्फ पप्पुशेठ यांनी आपल्या समर्थक यांच्यासोबत चर्चा करीत मंगळवार दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी रात्री उशिरा शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा चिटणीस पदाचा व सदस्य पदाचा राजीनामा हा पक्ष श्रेष्ठी यांच्याकडे पाठवून दिला आहे. जिल्हा परिषद माजी अध्यक्ष आस्वाद पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर पाटील कुटुंबीय यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले आहे.
ॲड. आस्वाद पाटील यांची भाजप पक्ष श्रेष्ठी यांच्यासोबत चर्चा करून समर्थकांसह भारतीय जनता पक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पक्षाचे जेष्ठ नेते यांच्या उपस्थितीमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे. आस्वाद पाटील यांच्या या कृतीमुळे मात्र शेतकरी कामगार पक्षाला घरातूनच मोठा धक्का दिला आहे.
आस्वाद पाटील यांनी पूर्वीचं म्हणजे राज्य कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह आस्वाद पाटील या आपल्या पदाचा मार्च 2023 राजीनामा दिला होता. त्यावेळी पहिला झटका महाराष्ट्र कबड्डी संघटनेसहित शेकापला हादरा बसला होता.
नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या सार्वत्रिक विधान सभा निवडणुक झाली यावेळी पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या सुनबाई चित्रलेखा पाटील या शेकापच्‍या उमेदवार असतानाही त्‍यांचे भाचे आस्‍वाद पाटील, बंधू माजी आमदार पंडित पाटील हे प्रचारापासून दूर राहिले. निवडणूकीपूर्वीच त्‍यांनी चित्रलेखा पाटील यांच्‍या उमेदवारीला विरोध केला होता. या निवडणूकीत चित्रलेखा पाटील यांना पंचवीस हजार हुन अधिक मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. आस्वाद पाटील यांनी अलिबाग मुरुडचे आमदार तथा महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांना छुपी मदत केल्याने चित्रलेखा पाटील यांचा पराभव झाला असल्याचीदेखील चर्चा सुरू आहे.
विधानसभा निवडणूकीचां माहोल संपल्‍यानंतर आता शेकापमधील पाटील परिवारातील वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले आहे. ॲड.आस्‍वाद पाटील यांनी अलिबाग शहरातील हॉटेल रविकिरण येथ समर्थकांची चर्चा करण्यासाठी सभा घेतली होती. या सभेत आस्‍वाद पाटील यांनी पक्षाचा राजीनामा देत असल्‍याचे जाहीर केले.
या बैठकीला पक्षातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपसथित होते. आस्‍वाद पाटील यांनी पक्षाच्‍या जिल्‍हा चिटणीस पदासह रायगड जिल्‍हा परीषदेचे उपाध्‍यक्षपद भूषवले आहे. त्‍यांनी पक्षाला दिलेली सोडचिठठी हा शेकापला मोठा धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading