५९ वर्षीय इसमाची बेडरूममध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली

Galfas
पोलादपूर (शैलेश पालकर) : 
तालुक्यातील पितळवाडी गावातील 59 वर्षीय इसमाने दारूच्या नशेत घरातील बेडरूममध्ये लोखंडी पाईपाला साडी बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना   शनिवारी दि. 3 मे रोजी सकाळी 8 ते 12 दरम्यान घडली. 
मयत  काशिनाथ शंकर चव्हाण (वय-59) यांना  गेले 5 वर्षापासुन दारु पिण्याचे अतिव्यसन असल्याने त्याने दारुचे नशेत त्याचे राहत्या घरातील बेडरूममध्ये लोखंडी पाईपाला  साडी बांधून स्वत:ला गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी पोलीस ठाण्यात सागर काशिनाथ चव्हाण (वय-३३ वर्षे,,रा पितळवाडी सध्या रा.खांबेश्वरवाडी, वाकण)  यांनी फिर्याद दिली.
पोलादपूर पोलिसांनी अकस्मात मृत्यू नोंद 07/2025 केली आहे या प्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार नितेश कोंढाळकर हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading