२६/११ दहशतवादि हल्ल्यातील शहीदांना महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे भावपुर्ण श्रद्धांजली

Uran Shahid Din
उरण ( विठ्ठल ममताबादे ) :
मुंबईमध्ये २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात मुंबईचे पोलीस, जवान व इतर निष्पाप लोक शहीद झाले.त्यांच्या स्मरणार्थ मंगळवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी साडेसात वाजता उरण पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना उरण तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्वप्रथम महाराष्ट्र पोलीस  बॉईज संघटनेचे उरण तालुकाध्यक्ष वैभव पवार यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. त्यानंतर २६/११ च्या हल्ल्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी, जवान व निष्पाप मृत्यूमुखी झालेल्या नागरिकांना दोन मिनिटे  स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पोलीस बांधवांसाठी, त्यांच्या नाय हक्कासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना स्थापन झाली असून बीड जिल्ह्यातील राहुल दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना कार्यरत असल्याचे सांगत पोलीस बांधवासाठी महाराष्ट्र शासनाने महामंडळ स्थापन करावे अशी मागणी यावेळी उरण तालुका सचिव हेमंत(पप्पू )व्यंकट सूर्यराव यांनी केली. संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या मागण्याही प्रशासनाकडे करण्यात आल्याचे हेमंत सूर्यराव यांनी सांगितले. यावेळी उपस्थित सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्य, नागरिकांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी, जवान, निष्पाप मृत्यूमुखी पडलेले नागरिक यांना पुष्प अर्पण करून, दिवे लावून भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली.
यावेळी उरण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ, न्हावा शेवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपक चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद जाधव, पोलीस कर्मचारी सचिन पाटील आदी मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त करून भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली. दरवर्षी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना उरण तर्फे २६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात येते, त्यांच्या स्मृतीना उजाळा देण्यात येतो. असे चांगले व प्रेरणादायी उपक्रम महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना राबवित असल्याचा सर्वांना अभिमान आहे. असेच चांगले उपक्रम संघटनेने राबवावेत. काही मदत लागल्यास मी नेहमी सहकार्यासाठी उपलब्ध आहे. आपल्या पाठीशी ठाम उभा आहे. कोणतेही मदत लागल्यास मला कळवा. असे मत यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी व्यक्त केले.
२६/ ११ च्या हल्ला झाला त्यावेळी उरण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सचिन पाटील हे मुंबई मध्ये होते त्यांनी दहशतवादी यांच्याशी लढा दिला व दीडशे हुन अधिक नागरिकांचा जीव वाचविला. आपल्या जीवाची पर्वा न करता जीवाची बाजू लावून नागरिकांचे प्राण वाचविल्या बद्दल पोलीस कर्मचारी सचिन पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे उरण तालुका उपाध्यक्ष गणेश पाटील, आय टी सेल प्रमुख निलेश गोहील, संपर्क प्रमुख वैभव तिलोरे, उपसचिव रवींद्र मोकल, युवा आघाडीचे अध्यक्ष स्वप्नील कुंभार, अध्यक्षा (महिला )कु. समृद्धी गोडे, उपाध्यक्ष धनेश मळगावकर, सचिव मयूर पाटील, उपसचिव वैभव मोरे, महिला आघाडीचे अध्यक्षा ऍड. प्रीती भारती, उपाध्यक्ष स्नेहल गोडे, सचिव नविना भोईर, उपसचिव माधुरी पाटील व महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे इतर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, पोलीस अधिकारी कर्मचारी, नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading