२०२४ च्या निवडणुकीत मोदी विरोधी लाट येऊन भाजपाचा साफ सुफडा होणार : अनंत गीते

Anant Gite Alibag Sogav
अलिबाग/सोगाव (अब्दुल सोगावकर ) :
३२ रायगड लोकसभा २०२४च्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे उमेदवारांच्या जनसंवाद दौरा, गावबैठका, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत.
अलिबाग तालुक्यातील मापगाव जिल्हा परिषद मतदार संघात आगरसुरे येथे शनिवार दि.१३ एप्रिल रोजी जनसंवाद दौरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी ३२ रायगड लोकसभा मतदार संघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कश्मीर ते कन्याकुमारी आणि मणिपूर ते मुंबई अशी जनसंवाद यात्रेला मिळालेला देशातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे या २०२४ च्या निवडणुकीत मोदी विरोधी सुनामी येणार आहे, त्यामुळे भाजपाचा साफ सुफडा  होणार आहे, असे देशभरात चित्र स्पष्ट असल्याचे अनंत गीते यांनी सांगितले आहे.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी अधिक बोलताना सांगितले की, २०१९ च्य निवडणुकीत मोदी लाट वैगेरे काही नव्हती, कारण त्यावेळेला भाजप जिंकली हे अर्धसत्य आहे तर काँग्रेस हरली हे देखील अर्धसत्य आहे, त्यावेळी काँग्रेस आघाडीला ३९.५०% मते मिळाली तर भाजपला ४१% मते मिळाली, यामध्ये केवळ १.५०% मते भाजपला जास्त मिळाली, आणि मीडियाने फक्त भाजप जिंकली हे सांगितले पण मतांची टक्केवारी सांगितली नाही, हि सत्य माहिती मीडियावर दाखवली गेली नाही, फक्त भाजप जिंकली हेच मीडियाने दाखवले आणि मोदी लाट आली आहे असे सांगितले. यावेळी तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते कश्मीर आणि मणिपूर ते मुंबई अशी काढलेल्या ‘भारत जोडो यात्रे’ ला देशातील जनतेचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे या २०२४ च्या निवडणुकीत मोदी विरोधी सुनामी येणार आहे, असे देशभरात ही वस्तुस्थिती व चित्र स्पष्ट असल्याचे सांगितले आहे.
शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांनी सांगितले की, रायगडच्या जनतेची घोर फसवणूक करणाऱ्या तटकरेना त्यांची जागा दाखवून टकमक टोकावरुन कडेलोट करायची आहे. इंडिया आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला अनंत गीते यांना प्रचंड मतांनी निवडून द्यायचे आहे, त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन केले आहे. यावेळी इंडिया आघाडीच्या इतर नेत्यांनीही कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या सभेला इंडिया आघाडीचे नेते तसेच शेकाप आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडितशेठ पाटील, शेकाप रायगड जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अर्थ व बांधकाम सभापती चित्रा ताई पाटील, महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रदेश सचिव ऍड प्रविण दादा ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, रायगड जिल्हा(उद्धव ठाकरे गट)शिवसेना प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, पिंट्या ठाकूर, काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा महिला अध्यक्षा श्रध्दा ठाकूर, शंकरराव म्हात्रे, किशोर जैन, विष्णू पाटील, चंद्रकांत मोकल व इतर सर्व इंडिया आघाडीचे नेते, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading