मेटाच्या मालकीचे लोकप्रिय मॅसेजिंग ॲप WhatsApp नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच काही जुनी ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या अँड्रॉइड फोनवर काम करणे थांबवणार आहे. या बदलाचा परिणाम दहा वर्षांपूर्वी आलेल्या अँड्रॉइडच्या किटकॅट व्हर्जनवर होईल.
१ जानेवारी २०२५ नंतर किटकॅट व्हर्जन वापरणाऱ्या फोनवर WhatsApp काम करणार नाही. हे दरवर्षी घडते, जेव्हा WhatsApp नवीन फीचर्सची अंमलबजावणी करताना जुन्या सिस्टीमचा सपोर्ट बंद करते. नवीन तंत्रज्ञान आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हे पाऊल उचलले जाते.
जर तुम्ही किटकॅट व्हर्जन वापरत असाल, तर WhatsApp सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला तुमची ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करावी लागेल किंवा नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करावा लागेल.