महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतलेल्या निर्णयानुसार, १ एप्रिल २०२५ पासून राज्यातील सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून दुप्पट टोल वसूल केला जाणार आहे.
एमएसआरडीसीच्या अंतर्गत येणाऱ्या वांद्रे-वरळी सी लिंक, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग यासह सर्व टोल नाक्यांवर फास्टॅगद्वारे टोल भरणे बंधनकारक असेल. मुंबईत हलक्या वाहनांना आणि शालेय बसेसना टोलमाफी असून त्यांच्यासाठी स्वतंत्र मार्गिका राहणार आहे.
१ एप्रिलपूर्वी वाहनचालकांनी फास्टॅग स्टिकर खरेदी करून त्याचा वापर सुरू करावा, अन्यथा आर्थिक दंड भरावा लागेल.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.