१६ वर्षीय रोहीतच्या मृत्यू प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात किरीट सोमया यांची रायगड हॉस्पीटल मधील दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी

Kirit Somaya
कर्जत (गणेश पवार) :
कर्जत तालुक्यातील मौजे मानिवली येथे राहाणार १६ वर्षीय रोहीत गवळी हा अलसर या अजारानी त्रस्त असलेल्या मुलावर कर्जत – कल्याण राज्य मार्गावरील डिकसळ येथील रायगड हॉस्पीटल येथे ऑपरेशन थेटरमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच रोहीतचा मृत्यू झाल्याचा कुटूंबीयांकडून आरोप होऊन संतप्त जमावा कडून रायगड हॉस्पीटलची तोड फोडची घटना देखील घडली होती.
या घटने संदर्भात नेरळ पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तर यासंदर्भात माजी खासदार किरीट सोमया यांनी मेडिकल कौन्सिल महाराष्ट्र राज्य, आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य व जिल्हा शल्यचिकित्सक रायगड यांच्या कडे केलेली तक्रारीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक रायगड यांच्या कडील प्राप्त अहवाळानुसार नेरळ पोलीस ठाण्यात संबंधित डॉक्टरांच्या विरोधात ३०४ अ, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. तर नेरळ पोलीस ठाणे यांना जिल्हा रुगणालय रायगड -अलिबाग यांचे कडील जाक्रजिरूअ/न्यावैवी/ अभिप्राय/नेरळ पो ठाणे/रोहीत गवळी/३१४/२५/ जिल्हा सामान्य रुग्णालय -अलिबाग, दि.०६/०१/ २०२५ अभिप्राय देण्याबाबतच्या पत्रानुसार दि. ०९/ ०१/२०२५ रोजी भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमया यांनी मयत रोहीत गवळी यांच्या कुटुंबीयांची मानिवली येथील राहात्या घरी भेट घेत, कुटुंबीय व कार्यकर्ते यांच्यासह नेरळ पोलीस ठाण्याला भेट देत १६ वर्षीय रोहीतच्या मृत्यू प्रकरणी रायगड हॉस्पीटल मधील दोषी डॉक्टरांना येत्या आठवड्यात अटक करून गुन्हा दाखल करण्याची नेरळ पोलीस ठाण्याकडे मागणी केली आहे. जर अटक व गुन्हा दाखल झाला नाही तर आठवडयानंतर मी गवळी परिवारासह नेरळ पोलीस ठाण्या समोर कारवाई होत नाही तो पर्यंत बसून राहणार असल्याचा इशारा किरीट सोमया यांनी दिला आहे.
मौजे मानिवली येथील राहाणार १६ वर्षीय रोहीत भगवान गवळी याच्या काही दिवसा पासुन सारखे पोटात दुखःत असल्याने व तो १० वी चे शिक्षण घेत असल्याने व १ मार्च रोजी बोर्डाची परीक्षा होणार असल्याने त्याला त्यांच्या घरच्यानी मंगळवार दि. २० फेब्रुवारी रोजी कर्जत – कल्याण राज्यमार्गावरी डिकसळ येथील रायगड हॉस्पीटल येथे उपचारा करीता नेले होते. रोहीत याला अलसर असल्याचे निदान झाल्याने रोहीतला रायगड हॉस्पीटल मध्ये दाखल करून घेण्यात आले होते. तर रोहीत गवळी याला डॉक्टरांनी साधारण दुपारचे ३.०० वाजण्याच्या सुमारास शस्त्रक्रीयेसाठी ऑपरेशन थेटरमध्ये घेतले मात्र रोहीत गवळी याचा शस्त्रक्रीया दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तर रोहीत हा शस्त्रक्रीयेसाठी स्वःता ऑपरेशन थेटर मध्ये चालत गेला असल्याचे व शास्त्रक्रीया करण्यापूर्वी रोहीत याचा बी पी व पल्सरेट हा नॉर्मल आले असल्याचे व डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच रोहीतचा मृत्यू झाला असल्याचा आरोप हा मयत रोहीत गवळी याच्या कुटूंबीयांनी आरोप केला होता.
या मृत्यूच्या घटने संदर्भात मयत रोहीतचा भाऊ ललीत भगवान गवळी यांनी डॉक्टरांनच्या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तर नेरळ पोलीस ठाण्यात ०७/२०२४ सी आर पी सी १७४ प्रमाणे आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. तर रोहीत याचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालय मुंबई येथे पाठविण्यात आला होता. या संदर्भात न्याय मिळण्या प्रति मयत रोहीत याचा मामा संदेश सुदाम कराळे यांनी दि. २३ फेब्रुवारी २०२४ रोजी भाजपचे माजी खासदार किरीट सोमया यांच्या कडे केलेल्याने भाजपचे माजी खासदार किरीट सोमया यांनी मेडिकल कौन्सिल महाराष्ट्र राज्य, आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य व जिल्हा शल्यचिकित्सक रायगड -अलिबाग यांच्या कडे तक्रार अर्ज सादर केले होते.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमया यांनी दि. २ मार्च २०२४ रोजी मयत रोहीत गवळी यांच्या कुंटूबियांची भेट घेत नेरळ पोलीस ठाण्याला भेट देऊन सदर प्रकरी कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी डी.डी. टेळे व नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरिक्षक शिवाजी ढवळे यांच्या बरोबर संबंधीत प्रकरणा विषयी चर्चा करून, या प्रकरणी कोणत्याही दबावाला बळी न -पडता प्राप्त अहवाळानुसार संबधीत दोषी डॉक्टरानवर उचित कारवाई करण्याच्या सुचना केल्या होत्या. तर जिल्हा शल्यचिकित्सक रायगड -. अलिबाग यांच्या कडून नेरळ पोलीस ठाण्यास प्राप्त अहवालामध्ये काही ठिकाणी डॉक्टरांचा हलगर्जीपणा दिसुन येत असल्याने रायगड हॉस्पीटलमधिल संबंधीत डॉक्टरांच्या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गु.र. नं. ४८ / २०२४ भा.द.वि कलम ३०४ ( अ ), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर जिल्हा रुगणालय रायगड -अलिबाग यांचे कडील जाक्रजिरूअ/न्यावैवी/ अभिप्राय/नेरळ पो ठाणे/रोहीत गवळी/३१४/२५/ जिल्हा सामान्य रुग्णालय -अलिबाग, दि.०६/०१/ २०२५ अनुसार अभिप्राय देण्याबाबतच्या नेरळ पोलीस ठाण्याला प्राप्त पत्रातील संदर्भ क्र.१ अनुसार आपल्या पत्रात नमुद ४ आरोपी डॉक्टर यांच्या उपचारातील हलगर्जीबाबत यापूर्वीच आपणास अग्रेसित केलेल्या अहवालात पूरेशे स्पष्ट केलेले भाष्य व त्यातील ठळक बाबी १) मयत रोहीत गवळी यांस सर्जन डॉ. अमरसिंह कांबळे व डॉ. सुरज यांनी प्रत्यक्ष तपासून अपेंडिक्सच्या आजाराचे निदान केले होते.व रक्त व चाचण्या पाहाता त्याच्यावर त्याच दिवशी शस्त्रक्रिया करण्याची गरज नसल्याचे समितीचे मत आहे. या सह एकूण ९ समितीने आपली मत मांडली आहे.
या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमया यांनी दि. ०९/ ०१/२०२५ रोजी मयत रोहीत गवळी यांच्या कुटुंबीयांची मानिवली येथील राहात्या घरी भेट घेत, रोहीतच्या कुटुंबीय व कार्यकर्ते यांच्यासह नेरळ पोलीस ठाण्याला भेट देत १६ वर्षीय रोहीतच्या मृत्यू प्रकरणी रायगड हॉस्पीटल मधील दोषी डॉक्टरांना येत्या आठवड्यात अटक करून गुन्हा दाखल करण्याची नेरळ पोलीस ठाण्याकडे मागणी केली आहे. जर एक आठवड्यामध्ये अटक व गुन्हा दाखल झाला नाही, तर आठवडयानंतर मी गवळी परिवारासह नेरळ पोलीस ठाण्या समोर कारवाई होत नाही तो पर्यंत बसून राहणार असल्याचा इशारा किरीट सोमया यांनी दिला आहे.
————————————-
रायगड हॉस्पिटल संदर्भातील केस संदर्भात ते आले होते. सिव्हील सर्जन रायगड- अलिबाग यांचा रिपोर्ट प्राप्त झालेल्या आहे. त्या रिपोर्टच्यानुसार कारवाई करावी एवढे ते सांगून गेलेले आहेत. काय कायदेशीर कारवाई असेल ती केली जाईल.
..डी डी टेळे, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading