१५ हजाराची लाच घेताना नेरळचा मंडळ अधिकारी संदीप भंडारे ACB च्या जाळ्यात

Neral Mandal Officer Sandip Bhandare
कर्जत (गणेश पवार) : 
१५ हजाराची लाच घेताना नेरळ मंडळ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. संदीप भंडारे असे या मंडळ अधिकाऱ्याचे नाव असून तो डोंबिवली येथील राहणारा आहे. तक्रारदार यांची जागेची नोंद करून घेण्यासाठी मंडळ अधिकारी यांनी १५ हजाराच्या लाचेची मागणी केली होती. आखेर आज लाच घेताना मंडळ अधिकारी भंडारे नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यात जाळ्यात अडकला आहे.
तक्रारदार यांची नेरळ परिसरा जवळील मौजे जिते या गावातील सर्व्हे नंबर ९१/१७, ९१/१८, ९१/१, ९१/१६ जागेची खरेदीखतानुसार सात बारारा सदरी नोंद करण्यासाठी नेरळ तलाठी कार्यालयाकडे प्रकरण दाखल करण्यात आले होते. तर तलाठी सजा नेरळ यांनी फेरफार दप्पतरी संदर जमिन मिळकतीच्या खरेदी खतानुसार नोंद करत त्यांचे काम करून अंतिम नोंद मंजुरीकरीता वरिष्ठ अधिकारी म्हणून नेरळ मंडळ अधिकारी संदीप भंडारे यांच्याकडे वर्ग केली होती. परंतू संदर जमिन मिळकती फेरफार दप्पतरी अंतिम नोंद करण्यासाठी नेरळ मंडळ अधिकारी संदीप भंडारे यांनी तक्रारदार यांच्या कडे एकूण तीन नोंदीचे प्रत्येकी १५ हजार रूपये प्रमाणे एकूण ४५ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती.
गेले सहा महिन्या पासून जमिन मिळकतीच्या नोंदीचे काम प्रलंबित असल्याने व मंडळ अधिकारी संदीप भंडारे हे पैशाची मांगणी करीत असल्याने, नाईलाजास्तव तक्रारदार यांनी सदर प्रकरणी लाच लुचपत विभाग नवी मुंबई विभागाकडे तक्रार केली असता, आज दि. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी लाच लुचपत विभाग नवी मुंबई विभागाकडून नेरळ तलाठी सजा कार्यालय येथे सायंकाळी साधारण ५.००ते ५.१५ वाजण्याच्या सुमारास सापळा रचला असता, नेरळ मंडळ अधिकारी संदीप भंडारे यांना तक्रारदाराकडून १५ हजाराची लाच स्विकारताना रंगे हाथ पकडले असुन, लाच लुतपत विभागानी प्रतिबंधक कारवाई करत ताब्यात घेतले आहे.
यावेळी मंडळ अधिकारी यांच्या कारमध्ये आणि त्याच्याजवळ साधारण एक लाख रुपयांची रक्कम देखील सापडून आल्याची माहिती समोर येत आहे. सदर कारवाई ही नवी मुंबई लाच लुतपत विभागाचे डिवाय एस पी नितिन दळवी, पोलीस निरिक्षक संतोष पाटील, ए एस आय प्रदिप जाधव, हवालदार, नाईक , गायकवाड , आहीरे, प्रमिला विश्वासराव यांच्या स्तरावरून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading