रोहा तालुका तसेच कोलाड विभाग वारकरी संप्रदायाची परंपरा लाभलेल्या श्री तीर्थ क्षेत्र तळवली तर्फे दिवाळी येथील प्रवचन, कीर्तनकार हभप नंदू महाराज तेलंगे यांचे वडील हभप परशुराम महाराज तेलंगे यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी अल्पशा आजाराने ६ एप्रिल रोजी प्राणज्योत मावळली. तळवली पंचक्रोशीत वारकरी संप्रदायावर शोककळा तर तेलंगे कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर पसरले आहे.
वारकरी संप्रदायाचे पाईक तथा धार्मिक आणि आध्यात्मिक विचारांचा प्रसार करणारे परशुराम महाराज यांनी वयाच्या 35 व्या वर्षी प्रातःस्मरणीय परमपूज्यनीय गुरुनाम गुरु सद्गुरु अलिबागकर महाराज यांचा सहवास प्राप्त झाला. त्यांच्या पवित्र चरणावर नतमस्तक होऊन भक्तीच्या मार्गावर वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन वाटचालीस सुरुवात केली. तदनंतर परमपूज्यनीय गुरुवर्य गोपाळ बाबा वाजे पंढरपूर यांच्या पवित्र हस्ते गळा तुळशीमाळ धारण केली आणि गावातील तसेच परिसरातील अनेकांना परमार्थाच्या मार्गाचे काम सुरू केले आणि या परिसरात आध्यात्मिक विचारांची प्रेरणा देण्याचे कार्य सुरू केले. हीच त्यांची सर्वात मोठी परमार्थिक संपत्ती आसलेल्या आध्यत्मिक वारकरी विचारांची एक चलवल हरपल्यानी या पंचक्रोशीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या निधनाची वर्ता समजताच सद्गुरु हरीश्चद़ महाराज प्रणित हरि ॐ सेवा संस्था खारपाले तालुका पेण जिल्हा रायगड येथून असंख्य वारकरी उपस्थित होते.तसेच रोहा, माणगाव, अलिबाग, पेन, पनवेल, बेलापूर, मुंबई ,ठाणे, व पुणे येथून त्यांच्या परिवाराशी सलग्न मंडळी वारकरी संप्रदायाची कोलाड विभागांतील त्यांच्या अंत्ययात्रेला उपस्थित होते.
सारे कुटुंबीय त्यांच्या पावलावर पाऊल टाकत संप्रदायाची परंपरा चालवत आहेत मागील डिसेंबमध्ये स्व.परशुराम महाराज यांचा शताब्दी महोत्सव “महामृत्युंजय शांती” हा कार्यक्रम मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी बुधवार दि. २०/१२/२०२३ रोजी भव्य दिव्य स्वरूपात मोठ्या आनंदोत्सवात कऱण्यात आले.मात्र आज त्यांच्या जाण्याने परिवारात जरी पोकळी निर्माण झाली असली तरी त्यांच्या सद विचारांचा ठेवा त्यांनी या परिवारासह परिसरात दिला आहे.
त्यांच्या दुःख काळात स्मरण प्रित्यर्थ ९ एप्रिल ते १८ एप्रिल या कालावधीत सलग सायंकाळी पाच ते सहा या वेळेत परिसरातील महात्म्यांचे कीर्तन प्रवचन सेवा तेलंगे कुटुंबियांनी आयोजित केली आहेत व सात ते आठ या वेळेत हरिपाठ असे धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत.ह.भ.प. गुरुप्रसाद महाराज पाटील आळंदी सद्गुरु हरिश्चंद्र महाराज प्रणित हरी ओम सेवा संस्था खारपाले गुरुकुल या सांप्रदायाचे उत्तराधिकारी,बबन महाराज वांजळे,मारुती महाराज कोल्हटकर, रघुनाथ महाराज रसाळ, बाळाराम महाराज शेळके, रुपेश महाराज शेळके,राम महाराज आंबेकर, अक्षय महाराज ओव्हाळ,वैभव महाराज खांडेकर, असे रायगड जिल्ह्यातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकार यांची प्रवचन सेवा तसेच तेरावे उत्तरकार्यानिमित्तने रायगड भूषण हभप गुरुवर्य पुरुषोत्तम महाराज पाटील (बापू) यांचं हरिकीर्तनाने पुष्पांजली अर्पण करण्यात येईल.
त्यांच्या पश्चात दोन मुले तीन मुली ह.भ.प. नंदू महाराज तेलंगे, ह.भ.प. अंकुश महाराज तेलंगे, श्रीमती सरोज चंद्रकांत घावटे,सौ. दीप्ती दिगंबर घावटे ,सौ. सुविधा सूर्यकांत वडे पुतणे, सूना, जावई ,नातवंडे असा मोठा तेलंगे परिवार असून त्यांच्या दशक्रिया विधी सोमवारी १५ एप्रिल रोजी श्री क्षेत्र उद्धर रामेश्वर मंदिर पाली येथे होणार आहेत तर उत्तर कार्य तेरावे त्यांच्या राहत्या निवासस्थानी मौजे तळवली (वाण्याची)तर्फे दिवाळी येथे संपन्न होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून प्राप्त झाली आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.