पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करणार्या तोतया पोलिसास पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले असून अधिक तपासात तो रायगड येथे होमगार्ड असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याने पनवेल शहर तसेच खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतीतील बतावणीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
श्लोक म्हात्रे हा त्याच्या मित्रासह सिकेटी कॉलेज जवळ असताना एक खाकी कलरची पॅन्ट व शर्ट घातलेला एक इसम त्याच्या जवळ आला व त्याने आपण पोलीस असल्याचे सांगून वडाळे तलाव येथे काही मुलांनी भांडण केले आहे व ते पेणचे आहेत असे सांगून त्याने माझ्या बरोबर पनवेल शहर पोलीस ठाणे येथे चल असे सांगून त्याला बरोबर घेतले व त्याला त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन ज्याची किंमती जवळपास 70 हजार रुपये इतकी आहे ती काढण्यास सांगून ती हिसकावून तो पसार झाला होता.
याबाबतची तक्रार सदर मुलाने पोलीस ठाण्यात करताच वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पोलीस निरीक्षक शाकीर पटेल, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, पोलीस हवालदार अमोल पाटील, पोलीस हवालदार संदेश म्हात्रे, पोलीस हवालदार महेश पाटील, पोलीस हवालदार तुषार बोरसे, पोलीस नाईक मिथुन भोसले, पोलीस शिपाई विशाल दुधे, पोलीस शिपाई किरण कराड आदींच्या पथकाने सदर मुलाने दिलेल्या माहितीच्या आधारे अधिक शोध घेतला असता सदर आरोपी रायगड परिसरात लपला असल्याचे निष्पन्न झाल्याने विशेष पथकाने सदर ठिकाणी जावून आरोपी रोहित अनिल भोसले वय 24 वर्ष धंदा होमगार्ड याला ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता अशा प्रकारचा गुन्हा खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुद्धा केल्याचे निष्पन्न झाले आहे. याच्या अटकेमुळे अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.