हुत्तात्मा स्मारक परिसरात व कम्युनिटी सेंटर हॉलची बकाल परस्थिती : माथेरान नगरपरिषदेचे मात्र अक्षम्य दुर्लक्ष

Hutatmasmarak Matheran

कर्जत ( गणेश पवार ) : 

माथेरान गिरिस्थान नगरपरिषद हद्दीतील असलेल्या हुत्तात्मा स्मारक परिसरात व कम्युनिटी सेंटर हॉलची बकाल परस्थिती झाली असल्याने, व या हुतात्मा स्मारक परिसरातील या बकाल परिस्थितीकडे माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने, ठेकेदरांच्या हिता पोटी हुतात्मा स्मारक परिसर स्वच्छ व सुंदर राखण्या पेक्षा अस्वच्छता व बकाल परिस्थिती निर्माण करून देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्मा वीरभाई कोतवाल यांचे स्मारकाचे पवित्र राखण्यात माथेरान गिरिस्थान नगरपरिदलेला रस राहीला नाही का? की देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्मा वीरभाई कोतवाल यांचे स्मारकाचा अवमान करण्यात रस आहे का? असा प्रश्न मात्र माथेरानकरांकडून उपस्थित केला जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडानंतर ब्रिटिश राजवटी मध्ये माथेरानचा शोध हा मे १८५० मध्ये ठाणे जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी ह्यू पॉयंट्झ मालेट यांनी लावला. तर त्यावेळचे मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी भविष्यातील हिल स्टेशन म्हणून विकासाचा पाया घातला व इंग्रजांनी माथेरानला उन्हाळ्याच्या उष्णतेवर मात करण्यासाठी एक लोकप्रिय रिसॉर्ट म्हणून विकसित करण्यात आले आहे. रायगड जिल्यातील कर्जत तालुक्यातीत सह्याद्री डोंगर रांगेतील डोंगर माथ्यावर वसलेले थंड हवेचे जगप्रसिद्ध ठिकाण म्हणून माथेरानला ओळख प्राप्त झालेल्या माथेरानच्या भूमित १ डिसेंबर १९१२ रोजी एका न्हावी समाजातील कुटुंबात जन्माला आलेले व ब्रिटीश राजवटीच्या विरोधात असलेल्या लढ्यात स्वतःला झोकून देत देश स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे स्वातंत्र्यसैनिक वीरभाई कोतवाल यांचे जन्मस्थान म्हणून याच माथेरानची मुख्य ओळख आहे.

देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्मा वीरभाई कोतवाल यांचे स्मरणार्थ त्यावेळचे राज्याचे मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांच्या कार्यकालात राज्य शासना मार्फत स्मारक बांधले आहे. याच स्मारक परिसरात माथेरान गिरिस्थान नगरपरिषदे माध्यमातून माथेरान मधिल नागरिकांसाठी सामाजिक कार्यक्रमासाठी दीड कोटी रूपये खर्च करून कम्युनिटी सेंटर हॉलचे देखील बांधण्यात आले आहे. तर या कम्युनिटी सेंटर हॉल मध्ये अंगणवाडी शाळा देखिल सुरू आहे.
मात्र माथेरान गिरिस्थान नगरपरिषदे कडून कम्युनिटी सेंटर हॉल हा माथेरान मधिल प्लास्टिक बाटल्या, पुठ्ठा आदि कचरा सदृश्य वस्तू करश मिशिन व्दारे करश करण्यासाठीच्या वापरासाठी देण्यात आल्याचे बोलले जात आहे. तर देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्मा वीरभाई कोतवाल यांचे स्मारक व कम्युनिटी सेंटर हॉल परिसरात बाटल्या , निकामी झालेल्या हाथ रिक्षा, एसटीपी कामाच्या ठेकेदाराचे पाईप व पाण्याच्या टाक्या आदी सामान व माथेरान मधील काढण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट निकामी क्लेफेवर ब्लॉक आशा वस्तूनचा खच पडल्याने व जागोजागी पडलेल्या फुटलेल्या अवस्थेतील काचेच्या बाटल्या तर चक्क हुतात्मा स्मारकाच्या शेड मधील कट्ट्यावर पार्क केलेली हाथ रिक्षा यामुळे बकाल परिस्थितीचे वास्तव समोर येत असल्याने व हुतात्मा स्मारक परिसरातील या बकाल परिस्थिती कडे माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने, ठेकेदरांच्या हिता पोटी हुतात्मा स्मारक परिसर स्वच्छ व सुंदर राखण्या पेक्षा अस्वच्छता व बकाल परिस्थिती निर्माण करून देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्मा वीरभाई कोतवाल यांचे स्मारकाचे पवित्र राखण्यात माथेरान गिरिस्थान नगरपरिदलेला रस राहीला नाही का? की देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्मा वीरभाई कोतवाल यांचे स्मारकाचा अवमान करण्यात रस आहे का? असा प्रश्न मात्र माथेरानकरांकडून उपस्थित केला जात आहे.
———————————————
आम्ही एक महिन्यात सदर कम्युनिटी सेंटर हॉल येथील क्रश प्रक्रिया प्रकल्प व हुतात्मा स्मारक परिसरातील पडलेल्या वस्तू माथेरान डम्पिंग ग्राउंड येथील पत्र्याच्या शेडमध्ये हालवण्यात येईल.
:- राहुल इंगळे, मुख्याधिकारी, माथेरान गिरिस्थान नगरपरिषद,
———————————————
माथेरान गिरिस्थान नगरपरिषदे कडून माथेरान मधील नागरिकांसाठी सामाजिक कार्यक्रमासाठी दीड कोटी रूपये खर्च करून बांधण्यात आलेला कम्युनिटी सेंटर हॉल हा नागरिकांचे हित जोपसण्या पेक्षा ठेकेदाराच्या हित जोपासण्याचे काम सुरू आहे. तर एसटीपी कामाच्या ठेकेदाराचे हित जोपासण्यासाठी मात्र देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्मा वीरभाई कोतवाल यांच्या स्मारक परिसराची बकाल अवस्था करून एक प्रकारे हुतात्मा वीरभाई कोतवाल यांच्या स्मारकाचा आवमान करण्याचे घाणेरडे कृत्य नगरपरिषदे कडून होत असल्याने, व आमच्या भावना दुखावल्या जात असल्याने, माथेरान गिरिस्थान नगर परिषदेतील याला जबाबदार असलेल्यांवर हुत्तात्मा स्मारकाचा आवमाना संदर्भात राज्य शासना कडून दखल व चौकशी करून त्वरित गुन्हे दाखल करावे.
…प्रसाद सावंत, माजी नगरसेवक, माथेरान गिरिस्थान नगरपरिषद,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading