‘हा’ जगातील पहिला ‘राष्ट्रीय’ महामार्ग, येथे मातीचा धुरळा उडू नये म्हणून पाणी फवारणी, मात्र दुरूस्तीकडे दुर्लक्ष

Goa Highway Kolad1
कोलाड ( श्याम लोखंडे ) :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची बिकट अवस्था पाहता रस्त्यावर प्रचंड धुरळा पडलेला असुन या धुरळ्याला पर्याय म्हणून मुंबई-गोवा महामार्गावर वाकण ते इंदापूर दरम्यान पाण्याची फवारणी केली जात आहे. परंतु रस्त्याच्या कामाला विलंब का ? कुठे खोदाई, कुठे मातीचा भराव, हाच खडतर प्रवास असा खड़ा सवाल प्रवासी वर्गाकडून केला जात आहे .
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोलाड, खांब,सुकेळी, वाकण, दरम्यान रस्त्याला पावसात पडलेले खड्डे व काही ठिकाणी नवीन कामासाठी चाललेली खोदाई त्यातुन तयार होत असलेला धुरळा यामुळे मार्गावरून प्रवास करतांना प्रवासी वर्गाची तारांबळ उडत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली बारा तेरा वर्षापासूून सुरू या कामात कोणतीही प्रगती नाही परंतु या मार्गाचे रखडलेले काम त्यामुळे होत असलेला धुरळा याला पर्याय म्हणून या रस्त्यावर गेली अनेक वर्ष पाण्याची फवारणी करण्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी पिण्यासाठी पाणी नाही मात्र कोकणात त्याच पाण्याचे मोल काय दररोज लाखो लिटर पाणी केवल धुरळ्यावर वाया जात आहे त्यामुळे हा जगातील पहिला राष्ट्रीय महामार्ग असावा की ज्यावर पाण्याची फवारणी केली जाते अथवा कोणताही विचार न करता टँकर च्या टँकर मार्गावर ओतले जातात तसेच या रस्त्यावर पसरलेला धुरळा याला पर्याय म्हणून पाणी फवारणी करून जणू टाईमपास चाललेला आहे असे दिसून येत आहेे.
मुबंई-गोवा हायवेवरील ब्रिटिशकाळातील बनविलेले जुने शिंगल रस्ते अनेक वर्षांनुवर्ष चालले परंतुु या महामार्गावरील चौपदरी करणात बनविण्यात आणलेले काही रस्ते व काँक्रीटीकरण वाहतुकीसाठी लगेचच धोकादायक ठरत असुन प्रवासी वर्गाच्या जिवाचा जणू खेळ मांडला आहे, तर काही ठिकाणी अद्याप खड्डेच आहेत ते देखिल बुजले जात नाही तर नव्या कामाला ताबडतोब सुरूवात केली जाते माञ दुरुस्तीकडे सदा नी गदा दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या धुळीला कितीही पाणी मारला तरी ही धूळ दहा मिनिटात कोरडी पडत आहे. हि धूळ मुंबई-गोवा महामार्गावर असणाऱ्या व्यवसायिकांच्या दुकानात पसरून मोठे नुकसान होते. शिवाय हि धुळ या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशी वर्गाच्या अंगावर उडत आहे. यामुळे हि धुळ नागरिकांच्या नाका तोंडात जाऊन सर्दी, खोकला व श्वसनाच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. तर हि धुळ डोळ्यात जाऊन अपघात धोका निर्माण होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याचे चौपदरीकरणाच्या कामामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल असे वाटत असतांना या महामार्गावरील रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले परंतुु बारा तेरा वर्षे उलटून गेली तरी या महामार्गाची रखडपट्टी त्यामुळे सर्व सामान्य नागरीक तसेच प्रवास करणारा प्रवासी वर्ग अक्षरशः हैराण झाला आहे .तसेच राज्याचे आणि केंद्रातील मंत्र्यांनी अनेकदा आश्वासन दिले होते. तर रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी किती वर्ष लागतील याची आजही खात्री देता येत नाही. यामुळे चिखल, खड्डे, धूळ यापासुन सुटका होण्यासाठी फक्त पाणी फवारणी करणे हा पर्याय नाही तसेच ज्यांना पाणी पिण्यास नाही पाणी टंचाई भासते त्यांना पाण्याची झळ काय हे समजते माञ कोकणात तसेच रायगडात फुकटचे पाणी टेकेदराचे काय जाय यावर जल सिंचन विभागाचे अंश आहे की नाही यावरच प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. महामार्गाच्या कामासाठी तसेच त्यावरील दुरुस्तीसाठी कोटयावधी रुपये खर्च झाले त्याचा काही गणितच नाही .त्यात माती आणि पाण्याचे मोळ काय असेल हेच कोड सर्व सामान्य जनतेला आहे.
त्यामुळे या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पुर्ण करण्याकरता संबंधितांनी लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशी वर्गातुन केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading