हातीव नं. १ शाळेचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गौरव

Uday Samant

संगमेश्वर  :

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्र .१ मध्ये हातीव नं.१ शाळेचा जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त होऊन तीन लाखाचे बक्षीस मिळाल्या बद्दल नुकताच मराठा भवन रत्नागिरी येथे शानदार सोहळ्यामध्ये पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह ‘ मानपत्र व तीन लाखाचा चेक देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव , शिक्षणाधिकारी कासार ‘ किरण लोहार व अन्य अधिकारी उपस्थित होते .
हा गौरव सरपंच नंदकुमार कदम, अध्यक्ष संदिप गावडे ‘ उपाध्यक्ष मानसी कारेकर ,माजी सरपंच राजश्री पवार माजी अध्यक्ष सोनाली गावडे ग्रामपंचायत सदस्या रिया सुतार ‘ सदस्य संदिप कांबळे ,पूर्वा गावडे ‘ प्रांजल कोटकर दिप्ती शिवगण श्रृती पर्शराम माजी मुख्याध्यापक धोंडू करंबेळे ‘ मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख सुनिल करंबेळे माजी केंद्रप्रमुख महेंद्र जाधव शिक्षिका रूपाली मांगले प्रगती ब्रीद ‘ पदवीधर शिक्षक विनय होडे माजी विद्यार्थी हरिष शिवगण ‘ श्रेया सुतार ‘ पूर्वा शिवगण ‘ अथर्व शिवगण ‘ तनिष गेल्ये ‘ किर्ती पर्शराम कार्तिकी गावडे यांनी स्वीकारला.
या आनंदा प्रित्यर्थ गावात येऊन भव्य मिरवणूक बेंजोच्या तालावर फटाक्यांच्या आतषबाजीत व डान्स करीत काढण्यात आली. यामध्ये गावतील आजी माजी विद्यार्थी शिक्षक ‘पालक ग्रामस्थ बहुसंख्येने सहभागी झाले सहभागी झाले . या सन्मानामुळे शाळेचे सर्वांकडून अभिनंदन होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading