हाकेला धावणारी श्री केळंबादेवी

Kelamba
पेण तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील जिते नाक्यावरून पूर्वेस साधारणतः दोन किलो मीटर अंतरावर पक्क्या डांबरी रस्त्याने जोडलं गेलेलं खरोशी गाव तसं बाळगंगा नदीच्या काठी बसलेले. मुळातच निसर्गरम्य सानिध्य लाभलेल्या डोंगरद-यांच्या कुशीत बसलेल्या या खरोशी गावाच्या उत्तरेस डोंगर माथ्यावर आहे. सर्वांच्या श्रद्धेचे श्री केळंबा देवीच मंदिर. पेण परिसरातील व मुंबईपासून ७० कि.मी.अंतरावर असलेल्या सर्वपरिचीत अशा भक्तांचे श्रद्धास्थान असणारी स्वयंभू साश्वत आणि सदैव जागृत असणा-या व नवसाला पावणा-या वेळोवेळी संकटाच निवारण करणाऱ्या खरोशी येथील श्री केळंबादेवीची माहिती आपल्या हाती देताना मता अतिशय आनंद होत आहे.
फार फार वर्षापूर्वी इथल्या डोंगर माथ्यावर ऋषीच वास्तव्य होत. बाळगंगा नदीच्या काठावरून या पवित्र ठिकाणी जाताना रस्त्याच्या बाजूला दुतर्फा पारिजातक, फणस, आंबा, चाफा यांची असंख्य झाडे आहेत. त्यामधून जाणा-या वाटेवर नजर पडली की वाटतचं श्री केळबादेवीआपणास दर्शनासाठी बोलवित आहे. देवीच्या रस्त्याला लागलो की, निसर्गाचा अविष्कार असलेला हिरवागार, सुखद असा रम्य परिसर पाहिला की, मनाला जी एक शांती लाभते त्याची तुलनाच करता येणार नाही मंदिराच्या परिसरात कुठेही पहायला मिळणार नाही इतक मोठ बेल वृक्षांच रानच्या रान आहे.
तसेच केळी, चाफा. रामवृक्ष, कणेरी या सारख्या इतरही फुलझाडांनी परिसर फुलून गेलेला आपणास दिसून येईल, अशा ठिकाणी वास्तव करुन आहे. तुमची आमची सगळ्यांची आई हाकेला धावणारी, नवसाला पावणारी, श्रद्धास्थान असणारी आई श्री केळंबादेवी. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे की, एके दिवशी गावातील एक गृहस्थ केळीची पाने आणण्यासाठी डोंगर माथ्यावर गेला असता त्याने एक केळ तोडली त्या केळीमधून लाल रक्त वाहू लागले. हा प्रकार पाहताच तो गृहस्थ घाबरला व सरळ गावात येऊन सदरचा प्रकार त्यांनी गावक-याच्या कानावर घातला. हे ऐकताच सर्व गावकरी त्या घडलेल्या चमत्कारिक दृश्याची पाहणी करण्याकरिता गेले असता त्यांनाही त्या केळीमधून लाल रक्त येत असल्याचे दिसून आले. या पाहिलेल्या दृश्यांची माहिती निष्णांत ज्योतिषाला सांगितली व त्याने सांगितले की, इथे निश्चितपणे भगवंताचे स्थान आहे. परमेश्वराचे स्थान आहे. या जागेवर देवीचे वास्तव्य आहे. त्यामुळे त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली. केळीच्या झाडातून प्रकट झालेल्या साक्षात व स्वयंभू देवीला श्री केळंबादेवी हे नाव देण्यात आले.
आजतागायत श्री केळंबादेवी जागृत असल्याची अनेक भक्तगणाना प्रचिती आली आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात करा वा संकटकाळी फक्त देवीच नामस्मरण करा म्हणजे आपल्या संकटाच निवारण करण्यासाठी धावून येणारच या बाबतीत हजारो लोकांचे अनुभव आपणास ऐकावयास मिळतील म्हणून तर नवरात्र उत्सवा व्यतिरिक्त दर मंगळवारी बाहेरील गावातील तसेच पेण, पनवेल, उरण, अलिबाग, ठाणे, मुंबई येथील लोक मोठ्या प्रमाणावर श्री केळंबा देवीच्या दर्शनाला येत असतात.
श्री केळंबा देवीचा नवरात्र उत्सव दरवर्षी फार मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. घटस्थापनेच्या दिवशी गावातून देवीची पालखी वाजत गाजत माऊलीच्या देवळात नेली जाते. नवरात्रीचे नऊ दिवस गावातील तसेच गावाच्या बाहेरील भक्तगण श्री केळंबा देवीच्या भक्तीपोटी, प्रेमापोटी व नवसापोटी देवळात दिवसरात्र वास्तव्य करून राहतात. नवरात्रीच्या उत्सवात नवस फेडण्यासाठी दूरशेत, जिते, बळवली, खारपाडा, गोविर्ले, आंबिवली दादर रावे कळवे हमरापुर या पंचक्रोशीतील लोकांची खूपच रिघ लागलेली असते.
देवीचा वास्तवाचा, संकटकालीन दर्शनाचा अनुभव कित्येक लोकांना आल्यामुळे प्रत्येक वर्षी या भक्तगणात खूपच वाढ झालेली दिसून येते. घटस्थापने पासूनख्या नवव्या दिवशी श्री केळंबादेवीची पालखी देवळातून निघून टाळ मृदुंगाच्या तालात भजन म्हणत गुलाल-बुक्का उधळत वाजत गाजत मिरवणुकीने पुन्हा गावात आणली जाते. अशा या जागृत, स्वयंभू नवसाला पावणाऱ्या श्री केळंबा देवीचे मंदिर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून म्हणजे शके १६०७ मध्ये बांधले होते. आजपर्यंत ४१७ वर्षे या मंदिरास झाली. सर्व गावक-यांनी एक निश्चयाने एक दिलाने एक मनाने मंदिराचा जिर्णोद्धार करून गावकरी मंडळीनी आपल्या समस्या अडचणी, संकटे बाजूला सारून व भक्तगणांकडे मदतीचा हात मागून आज हे भव्य आणि दिव्य मंदिर उभे केले आहे.
माऊली केळंबा मातेचा नवरात्र उत्सव ३ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर असा नऊ दिवस चालणार आहे. या नवरात्री नऊ दिवस पाटील व माळी भाऊबंद यांची पाळी असल्यामुळे ते नऊ दिवस माऊलींची सेवा करणार असून गावातील घरत, पाटील, ठाकूर, म्हात्रे, माळी, भोंडकर व गावंड भाऊबंद आलेल्या सर्व भक्तांना मनोभावे दर्शन देऊन त्यांचे स्वागत करण्यात येते. तसेच लाखो भक्तगण मोठ्या श्रद्धेने नवस बोलण्यासाठी नवस फेडण्यासाठी येत असतात. नवरात्रीचा उत्सवात नऊ दिवस लाखो भाविक दर्शन घेतात. आलेला प्रत्येक भक्तगण डीजेच्या तालावर मनसोक्तपणे नृत्य करून आनंद द्विगुणित करत असतात. आणि नंतर त्यांची पावले घराकडे वळतात अशा माऊलीच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांचे मनापासून स्वागत.

..धनाजी घरत, 

  खरोशी, पेण

Nca1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading