हरीहरेश्वर समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या महिलेचा सेल्फी काढण्याच्या नादात पाण्यात वाहत जात मृत्यू !

हरीहरेश्वर समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या महिलेचा सेल्फी काढण्याच्या नादात पाण्यात वाहत जात मृत्यू !
वेळास आगर (संतोष शिलकर) : 
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरीहरेश्वर समुद्रकिनारी भुई कुंडी मार्गाकडे असणाऱ्या विष्णुपथ येथे फोटो काढण्याच्या नादात उसळलेल्या लाटेमध्ये तोल जाऊन ठाणे पाचपाखाडी येथील पल्लवी राहुल सरोदे वय वर्ष ३७ या महिलेचा मृत्यू झाला आहे.
हरिहरेश्वर येथे पर्यटनासाठी आलेल्या ठाण्याच्या तरूणीचा येथील तीर्थक्षेत्र प्रदक्षिणा ठिकाणी खडकावर सेल्फी घेतांना समुद्राच्या लाटांचा अंदाज न आल्याने लाटांच्या तडाख्यात पाय घसरला व लाटांच्या प्रवाहाबरोबर पाण्यात पडल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी दिनांक २३ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता घडली आहे.
हरिहरेश्वर येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ येथे ठाणे येथील नऊ महिला शनिवारी रविवार सुट्टी असल्यामुळे मुक्कामासाठी आल्या होत्या.सकाळी देवदर्शन झाल्यावर तीर्थक्षेत्र प्रदक्षिणा येथे आल्या होत्या. तीर्थक्षेत्र प्रदक्षिणा येथे फोटो काढण्यासाठी प्रदक्षिणा पायर्या जवळ जात असताना स्थानिकांनी सदरच्या महिलांना खडकावर लाटा येत असल्याची कल्पना दिली होती.
पाच ते आठ फूट उंच उसळणाऱ्या लाटां बरोबरचा सेल्फीच्या नादात पल्लवी राहुल सरोदे.(वय ३७.पाचपाखाडी.ठाणे) ही तरूणी धोकादायक अशा खडकावर जात असताना इतर महिला प्रदक्षिणा पायर्यांजवळ थांबल्या व सदरच्या तरूणीस सुचना करीत होत्या.परंतु सेल्फीचा मोह नडला व लाटेच्या तडाख्याने तरूणी खडकावरून पाण्यात पडली.
महिलांचा आरडाओरडा ऐकताच हरेश्र्वर येथील बोटींग व्यवसायीक अक्षय मयेकर व अमर कवडे या दोघांनी खवळलेल्या समुद्रात बोटीच्या सहाय्याने सदरच्या तरूणीचा शोध घेतला परंतु पोटात पाणी गेल्याने पल्लवी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
[सूचना फलक नाहीत त्यातच पर्यटक गांभीर्याने घेत नाहीत त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत.]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading