श्रीवर्धन तालुक्यातील श्री.क्षेत्र दक्षिणकाशी हरिहरेश्वर या तीर्थक्षेत्राला वर्ष भरात लाखो पर्यटक आणि भक्तगण येत असतात निसर्गाने नटलेल्या अतिशय प्राचीन अशा ह्या तीर्थक्षेत्राची ख्याती आहे.अथांग निळाशार समुद्र पर्यटकांना भुरळ पडतो प्रदक्षिणा मार्गावरती असलेल्या या निसर्ग सौंदर्याच्या मोहा मध्ये आलेले पर्यटक सेल्फी आणि रिल्स च्या मोहात पडल्याने आपले स्वतःच्या जीवाच्या सुरक्षेतेचा मात्र त्यांना विसर पडतो.
या अगोदर असे प्रकार बऱ्याच वेळा घडले आहेत.चारच दिवसांपूर्वी भुईकुंडी मार्गावर असणाऱ्या विष्णूपथ येथे सेल्फी काढण्याच्या नादात ठाणे पाचपाखाडी येथील पल्लवी राहुल सरोदे वय वर्ष ३७ या आपल्या मोहाला आवरू शकल्या नाहीत. शेवटी एका आलेल्या मोठ्या लाटेमध्ये पाण्याच्या प्रवाहा बरोबर वाहत गेल्या. घडलेली ही घटना वाऱ्यासारखी पंचक्रोशी मध्ये पसरल्या नंतर उपस्थित हरीहरेश्वर आणि साळुंखे रेस्क्यू टीमचे काही सदस्य रुद्र वॉटर स्पोर्ट्स च्या बोटीच्या सहाय्याने अमर कवडे,अक्षय मयेकर या सभासदाने त्वरित महिलेच्या दिशेने खोल समुद्रात तिला वाचवण्याच्या दृष्टीने आपल्या बोटी मधून दोघांनीही खोल समुद्रा मध्ये उड्या घेतल्या क्षणाचाही विलंब न लावता स्वतःचा जीव धोक्यात घालून या टीमचे सर्व सभासद दुर्घटने वेळी करत असतात.आज पर्यंत गेली कित्येक वर्षांमध्ये असंख्य भाविकांचे प्राण वाचवण्यात त्यांना यश मिळालेले आहे.परंतु याची प्रसिद्धी मात्र या सदस्याने घेतलेली नाही.
या दिवशी सुद्धा स्वतःच्या जीवाशी खेळत स्वतःचा जीव धोक्यात घालत या महिलेचे प्राण वाचावे म्हणून अतोनात प्रयत्न केले बऱ्याच तासा नंतर तिला किनाऱ्या वरती आणण्या मध्ये त्यांना यश प्राप्त झाले. परंतु किनाऱ्या वरती आणल्या नंतर CPR देऊन सुद्धा काही रिस्पॉन्स मिळत नसल्या मुळे सरते शेवटी जवळच असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय येथे घेऊन गेले.संबंधित डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता ती मृत असल्याचे घोषित केले.
सांगण्याचे तात्पर्य एवढेच आहे की,या मार्गा वरती वारंवार रोड वरती तसेच पाण्याच्या माध्यमातून घडणाऱ्या असंख्य दुर्घटनांमध्ये देवदूत म्हणून धाव घेणारी ही टीम कधीही प्रसिद्धीच्या झोतामध्ये आली नाही किंवा कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवणाऱ्या या सभासदांना कुठलाही मानधनाची न अपेक्षा ठेवत मित्र परिवारामध्ये उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करत जनहिता करिता वारंवार रात्री अपरात्री धावून जाणाऱ्या या टीम मधील सर्व सदस्य प्रदीप टाकळे,धीरज बोरकर,सुकृत कोलथरकर,केतन कोलथरकर,रुपेश मयेकर,अक्षय मयेकर,अमर कवडे, अच्युत आपटे,सचिन गुरव,निनाद गुरव,सुयोग लांगी, सुयोग मयेकर,सिद्धेश लांगी,प्रथमेश कोलथरकर, स्वप्निल कोलथरकर,अनिकेत मयेकर व इतर सहकारी काही दिवसापूर्वीच माणगाव येथून मूर्ती विसर्जित करण्या करिता आलेली पिकप गाडी पाण्यामध्ये पूर्णपणे फसली होती तिला बाहेर काढताना जोराची भरती लागली त्यावेळी एक दोन सदस्यांना आपल्या जीवास मुकावे लागणार होते.परंतु परिस्थिती पाहताप्रसंगावधान बाळगत काही तज्ञ सहकाऱ्यांच्या मदतीने होणारा अनर्थ टाळला होता.
शासनाकडे या बातमीच्या माध्यमातून या सेवा भावी मित्र मंडळात काम करणाऱ्या साळुंखे रेस्क्यू टीम,आणि हरिहरेश्वर रेस्क्यू टीम मधील सदस्यांना लागणाऱ्या उपयुक्त साधन सामुग्रीची गरज आहे.ती भेट स्वरूपात कोणी मदत केली तर त्यांच्या मदत कार्याला लाख मोलाचा सहकार्य लाभेल. याकरिता शासना कडून इथे लागणाऱ्या उपकरणांची व्यवस्था व्हावी.किंवा अनेक सेवाभावी संस्था काम करत असतात अशा संस्थांनाना आवाहन करण्यात येत की सदर रेस्क्यू टिमला जर कोणी सहकार्य करत असेल तर त्यांनी संपर्क साधून त्यांच्या या कार्याला हातभार लागावा अशी विनंती करण्यात येत आहे. जेणे करुन पुढील कार्य करण्यास त्यांना शक्ती आणि बळ मिळेल,त्यांच्या या मागणीला व सत्य परिस्थितीला सहकार्याची गरज आहे.
प्रशासनाने सुध्दा दक्षिण काशी श्रीक्षेत्र हरिहरेश्वर येथे लोकहिता कामी काम करत असलेल्या या साळुंखे रेस्क्यू टीम आणि हरिहरेश्वर रेस्क्यू टीमच्या या धाडसी कार्याला सहकार्य करावे अशी मागणी मागणी या परिसरातून आणि या सेवाभावी मित्र मंडळा कडून,या रेस्क्यू टीम कडून करण्यात येत आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.