हरवलेली मूकबधीर मुलगी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप आईच्या ताब्यात, पेण पोलिस कुटुंबासाठी ठरले देवदूत

हरवलेली मूकबधीर मुलगी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप आईच्या ताब्यात, पेण पोलिस कुटुंबासाठी ठरले देवदूत
PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
पेण शहरातील दातार आळी येथे राहणारी ३० वर्षीय जन्मजात मूकबधीर मुलगी मालता चिंधू साटम ही २१ डिसेंबर २०२२ रोजी हरवल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. तिच्या आई वंदना चिंधू साटम यांनी पेण पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, तक्रारीनुसार पोलिसांनी तिला शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू केले. मात्र, मालता मूकबधीर असल्याने शोधकार्य कठीण जात होते. तिच्या उजव्या हातावर तिच्या भावाचा, लक्ष्मण साटम याचा मोबाईल नंबर गोंदविला असला तरी तो स्पष्ट दिसत नसल्याने पोलिसांना याचा उपयोग होऊ शकला नाही.
गुजरातमध्ये मिळाली गोपनीय माहिती
पेण पोलिसांनी स्थानिक पातळीपासून शेजारच्या राज्यांपर्यंत शोधकार्य सुरू ठेवले. या दरम्यान, पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की हरवलेली मालता गुजरात राज्यातील नवसारी जिल्ह्यात चिखली तालुक्यातील खुंद गावातील नारी संरक्षण केंद्रात असल्याची माहिती मिळाली.
मुलगी सुखरूप घरी परतली
पोलिसांनी त्वरित नवसारी येथील नारी संरक्षण केंद्राशी संपर्क साधून तपास केला. त्यानंतर मालताची ओळख तिच्या नातेवाईकांशी जुळवून पाहिली. सर्व ओळख पटल्यानंतर पेण पोलिसांनी तिला सुरक्षितरित्या पेणला आणून तिच्या आई वंदना साटम यांच्या ताब्यात दिले.
पोलीस पथकाचे विशेष कौतुक
या कठीण शोधकार्यात पेण पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने महत्वाची भूमिका बजावली. त्यांनी हरवलेल्या मुलीला सुखरूपपणे घरी आणून आईच्या हातात सोपवले. या कार्यासाठी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. हरवलेल्या मालताला सुखरूप परत मिळवून देणारे पेण पोलिस हे कुटुंबासाठी देवदूत ठरले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading