नेरळ पूर्व परिसरात बदलापूर येथून आलेल्या चार वर्षीय चिमुरड्याचा स्विमिंग पुलमध्ये पडून दुर्देवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. मृत झालेल्या चार वर्षीय मुलाचे नाव आयांश अभिजित निवाळकर असे असून तो आपल्या आई सोबत फिरण्यासाठी म्हणून नेरळ येथे आला होता. दरम्यान सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आयांश हा आपल्या आईचे लक्ष चुकवून हा स्विमिंग पुलाजवळ गेला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असुन, नेरळ पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर पुढील तपास हा नेरळ पोलीस करीत आहेत.
बदलापूर वेस्ट जवळील शनिमंदिर परिसरातील मनोहर निवास इमारतीत राहणारे निवाळकर हे चार वर्षीय आयांश मुलगा आणि आई असे फिरण्यासाठी आपल्या मैत्रिणींसोबत शनिवार दि. ०१ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास नेरळ येथे आले होते. निवाळकर आणि त्यांच्या मैत्रिणी ह्या नेरळ जवळील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील आशीर्वाद व्हीला या फार्महाऊसवरील बंगल्यात वस्तीला राहिले होते. त्यांच्या सोबत त्यांची लहान मुले देखील होती. सर्व पाच महिला आणि एक व्यक्ती त्याच सोबत लहान पाच मुले असा हा ग्रुप होता.
दरम्यान दुपारचे जेवण करून ह्या महिला बंगल्याच्या टेरेसवर गप्पागोष्टी करण्यासाठी बसले असताना, लहान मुले बाजूला खेळत होती. यावेळी निवाळकर यांचा चार वर्षीय मुलगा आयांश अभिजित निवाळकर हा लहान चिमुरडा आईची नजर चुकवत बंगल्या मध्ये असणाऱ्या स्विमिंग पूल जवळ गेला असता तो पाण्यात पडला. ही घटना सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली होती. जवळ जवळ १५ मिनीटे हा मुलगा पाण्यात पडून होता. मुलगा कुठे दिसून येत नसल्याने निवाळकर ह्या मुलाचा शोध घेत होत्या दरम्यान मुलगा हा स्विमिंग पुलच्या पाण्यात पडल्याचे दिसून आल्याने आईने एकाच टाहो फोडला. सदर चार वर्षीय मुलाला नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता, पाण्यात बुडाल्याने मुलाचा गुदमरून मृत्यू झाल्याचे नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपस्थित डॉक्टरांनी यावेळी सांगितले आहे.
एकूणच स्विमिंग पूल परिसरात कुठलेही सुरक्षा ही फार्म हाऊस मालकाने ठेवलेली नसल्याचे समोर आले आहे. तर निवाळकर कुटुंबात ९ वर्षाने मुलगा जन्माला आला होता अशी माहिती देखील समोर आलेली आहे. यावेळी नेरळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तर नेरळ पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास हा नेरळ पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक युवराज साळुंखे हे करीत आहेत.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.