कर्जत ग्रामीण ( मोतीराम पादीर ) :
कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नितीन सावंत यांच्या नावावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केल्याने युवासैनिक शिवसैनिक व महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी – कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असता आगामी विधानसभा निवडणुक ही स्वाभिमानाची निवडणूक असून ही स्वाभिमानाची लढाई आता जिंकल्याशिवाय थांबणार नाही असा निर्धार खोपोलीतील शिवालय कार्यालयामधील आढावा बैठकीत निष्ठावंत शिवसैनिकांनी 30 सप्टेंबर रोजी केला. तर ही बैठक उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत व तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, संपर्क प्रमुख उमेश गावंड, सल्लागार गजानन पाडगे, भरत देशमुख, शहर प्रमुख संभाजी पाटील, उपतालुका प्रमुख दिनेश घाडगे, युवासेना जिल्हा समन्वयक प्रशांत खांडेकर, उपजिल्हाधिकारी महेश पाटील, नितीन पाटील, अविनाश आमले, विशाल म्हामूनकर, कल्पेश पाटील, तुळशीराम पाटील, चिंतामणी चव्हाण, रामकृष्ण पाटील, प्रणाल लाले, राजेश मेहेतर, मोहन शिंदे, अंकुर बामणे, रोहीत बामणे, योगेश आगिवले, विलास पाटील, अक्षय देशमुख, महिला आघाडीच्या सुविधा विचारे, शैला भगत, वैजयता गायकवाड, भारती लोते, आरती तांडेल, प्रिया मालुसरे, तेजश्री बोरडे, पायल गायकर आदी प्रमुखांसह शिवसैनिक युवा सैनिक व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 28 सप्टेंबर रोजी मातोश्रीवर आढावा बैठक घेत या आढावा बैठकीतून उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांना कामाला लागायचे आदेश दिल्याने या आदेशातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नितीन सावंत यांच्या नावावर उमेदवारी शिक्कामोर्तब झाल्याचे पहावयास मिळाले. तर उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला असून नितीन सावंत यांच्या रूपाने निष्ठावंत शिवसैनिकांना आमदारकीचे तिकीट मिळणार असल्याने सर्वजण एक दिलाने काम करण्यास सज्ज झाले असता आढावा बैठकीच्या माध्यमातून सर्वांनी नितीन सावंत यांना आमदार करण्याचा निर्धार करत मोर्चेबांधणी सुरुवात केली आहे तर याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खालापुर तालुक्याची आढावा बैठक खोपोलीतील शिवालय मध्यवर्ती कार्यालयात 30 सप्टेंबर रोजी पार पडली. यावेळी सर्व उपस्थितांनी नितीन सावंत यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आम्ही आपल्या पाठीशी खंबीर राहून कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही असे अभिवचन सावंत यांना उपस्थितानी दिल्याचे पहावयास मिळाले.
तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे यांनी आपल्या मनोगतातून बोलताना म्हणाले की, नितीन सावंत यांच्या रूपाने आपल्याला निष्ठावंत उमेदवार हा विधानसभा निवडणुकीसाठी लाभला आहे, नितीन सावंत यांनी खऱ्या अर्थाने कर्जत खालापुरात निष्ठावंतांची फळी निर्माण करत शिवसेनेच्या पडत्या काळात उभारी देण्याचे काम केले. नितीन सावंत यांनी गेल्या अडीच वर्षात आपल्याला योग्य ती साथ देत सर्वसामान्यांना पाठबळ दिले तर त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून पुढील काळात त्यांना आपण पाठबळ देणं गरजेचे असून सर्वांनी या निष्ठावंत शिवसैनिकांना विधान भवनात पाठवत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठबळ द्या, त्याच पाठबळाच्या जोरावर ते आपल्या समस्या मार्गी लावतील असे तालुकाप्रमुख पिंगळे यांनी मत व्यक्त केले.
तसेच यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी आपले मत मांडताना म्हणाले की, मी एकटा आमदारकीचा उमेदवार नसून आपण सर्व जण आमदार म्हणून पुढील काळात काम करणार आहात, उद्धव साहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण सर्वांनी आपापसातील मतभेद बाजूला सारत एक दिलाने काम करा तर आपण टाकलेल्या विश्वासाला पुढील काळात तडा जाऊ न देता आपले निस्वार्थीपणे काम करेल, असे उपजिल्हाप्रमुख सावंत म्हणाले.