स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रायगडावर भाजपाचा झेंडा फडकणार : खा. धैर्यशील पाटील

मुंबई (मिलिंद माने) : 
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर राज्यात भाजपा ने सदस्य नोंदणी अभियान चालू केली आहे या नोंदणीच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील पनवेल ,उरण ,पेण, अलिबाग ,महाड ,कर्जत, श्रीवर्धन या ७ ही विधानसभा मतदारसंघात भाजपा सदस्य नोंदणी अभियान चालू केली आहे. या सदस्य नोंदणीच्या माध्यमातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिकेसह नगरपालिका ,नगरपरिषदा व नगरपंचायती यांच्यासह रायगड जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर भाजपाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार दक्षिण रायगड भाजपा अध्यक्ष व राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकी मध्ये रायगड जिल्ह्यातील रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे हे खासदार झाले तर रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघात शिंदे सेनेचे श्रीरंग बारणे हे खासदार झाले मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पनवेल, उरण व पेण हे तीन विधानसभा मतदारसंघ भाजपाने आपल्याकडे कायम ठेवले तर अलिबाग ,महाड कर्जत हे तीन विधानसभा मतदारसंघ शिंदे सेनेने आपल्याकडे कायम ठेवले तर एकमेव श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे कायम राहिला आहे.
राज्यात मागील पाच वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणामुळे प्रलंबित राहिल्या असून २२जानेवारी रोजी याबाबत सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी असून या दिवशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल लागून निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपाने रायगड जिल्ह्यावर आपला धबधबा कायम ठेवण्यासाठी भाजपा सदस्य नोंदणी मोहीम चालू केली आहे.
रायगड जिल्ह्यातील सात ही विधानसभा मतदारसंघात भाजपा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार धैर्यशील दादा पाटील व उत्तर रायगड जिल्हा भाजपा अध्यक्ष तथा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रशांत दादा ठाकूर यांनी जिल्ह्यातील भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला गांभीर्याने घेऊन प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सदस्य नोंदणी मोहीम जोमाने चालू केली आहे. त्याचाच परिणाम म्हणून भाजपा सदस्य नोंदणीला रायगड जिल्ह्यातील सात ही विधानसभा मतदारसंघात मोठा प्रतिसाद मिळत असल्याने शिंदे सेना,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शरद पवार गट व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता निर्माण झाली आहे.
रायगड जिल्ह्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत, अलिबाग व महाड या तीन विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाचे आमदार निवडून आले होते मात्र २०२२ मध्ये झालेल्या शिवसेना पक्ष फुटी नंतर तिन्ही आमदार शिंदे गटात सामील झाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला या धक्क्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष २०२४च्या विधानसभा निवडणुकीत देखील सावरू शकला नाही परिणामी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठ्या प्रमाणावर रायगड जिल्ह्यात तील पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे त्याच पद्धतीने . श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार कुमारी आदिती तटकरे या अजित पवार गटात गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची अवस्था देखील जिल्ह्यात तशीच झाली आहे.
यामुळे शरद पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकाऱ्यांना सध्या वाली राहिला नसल्याने किंबहुना पक्षाच्या वरिष्ठांनी देखील जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांकडे जाणीवपूर्व दुर्लक्ष करण्यास चालू केल्याने नाराज झालेले शरद पवार व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटापेक्षा भाजपाकडे जाणे पसंत केले असून लवकरच जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पडणारा असल्याचे संकेत प्राप्त होत असून याचाच फायदा भाजपाने उचलण्याचे चालू केले असून या निमित्ताने सदस्य नोंदणी मोहीम प्रक्रिया रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात चालू केली असून याबाबत उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष व पनवेलचे विद्यमान आमदार प्रशांत दादा ठाकूर व दक्षिण रायगडचे भाजपा जिल्हाध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार धैर्यशील दादा पाटील यांनी गावोगावी जाऊन मेळावे आयोजित करून भाजपा पक्षांमध्ये सामील होण्याबाबत कार्यकर्त्यांना व पक्षात सामील होणाऱ्या नवनिर्वाचित सदस्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन चालू केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपात मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग चालू केल्याने रायगड जिल्ह्यात लवकरच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला व शरदचंद्र पवार पक्षाला खिंडार पडणार असून यामुळे त्याचा परिणाम रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर होणार आहे
रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिकेसह पनवेल, उरण, पेण, अलिबाग, महाड, कर्जत, श्रीवर्धन या साथ ही विधानसभा मतदारसंघातील नगरपरिषदा, नगरपंचायती त्याचबरोबर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येत्या काळात होणार असल्याने त्या निवडणुकीवर भाजपा आपले उमेदवार उभे करून ते उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपा पक्षाने कार्यकर्त्यांची फौज ग्रामीण भागात तयार केली आहे यानिमित्ताने रायगड जिल्हा भाजपा मय करण्याचा निर्धार केला असून त्यासाठी दक्षिण रायगड जिल्हा भाजपा अध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार धैर्यशील दादा पाटील यांनी दक्षिण रायगडमध्ये शतप्रतिशत भाजपा मोहीम चालू केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading