स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेची अखंड गडसंवर्धन मोहिम सुरू ! पाण्याच्या टाक्या, गड संवर्धनासाठी शिलेदार एकटवले

Surgad Savardhan
कोलाड ( श्याम लोखंडे ) :
रायगड जिल्ह्यात तसेच रोहा तालुक्यातील खांब विभागातील ऐतिहासिक शिवकालीन गड असलेल्या सुरगड किल्ल्यावर स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेची अठ्ठावीसवी अखंड गडसंवर्धन मोहीम राबवण्यात आली. रविवारी ३१ मार्च २०२४ रोजी स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेची ही मोहिम यशस्वी झाली.
अविरतपणे चालत आलेल्या मोहिमेतून सहा टाकी समुहातील पाण्याच्या टाक्या मागच्या वर्षात गाळ मुक्त केल्यानंतर पुन्हा एकदा गडावरील पाण्याच्या टाक्या साफ करण्यासाठी सुरगडाचे शिलेदार सज्ज झाले. छत्रपति शिरायांच्या जय घोषाने येथील शिलेदार तसेच गड संवर्धन शिवप्रेमी यांनी मोहिमेस पुन्हा प्रारंभ केला तर या मोहिमतून शिलेदारांनी गडाच्या उत्तर बुरूजाकडील पाण्याच्या टाकीतील चिखल, माती, दगड गोटे असा गाळ साफ करत या पाण्याच्या टाकीला गाळमुक्त करत एक मोकळा श्वास निर्माण करून दिला.
शिवकालीन परंपरा जोपासत येथील स्थानिक युवक तसेच शिवप्रेमी सुरगडावर जाऊन विविध उपक्रम राबवतात तसेच येणाऱ्या पर्यटकाना आकर्षित म्हणून गड संवर्धन स्वच्छ्ता मोहीम राबवण्यात येतात. या अनुषंगाने गडावर पावसाळ्यात रस्त्यावर आलेले दगड गोटे, काटेरी झुडपे, पाय वाटा मोकळ्या करणे, तर काही ठिकाणी ढासलेले चिरे बसवण्याचे काम येथील स्थानिक सुरगड संस्था या मोहिमेतून अखंडपणे करत आहे.
छत्रपति शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा गड पायथ्याशी असलेल्या घेरासुरगड ग्रामस्थ, युवक मंडळ व महीला मंडळ यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. या प्रसंगी जन्मदिवसाचे औचित्य साधून या वर्षी ग्रामस्थ नागरीक यांच्या सहकार्यातून नव्याने भव्य दिव्य असे शिवस्मारक उभारण्यात आलेल्या स्मारकाचे दर्शन घेत छञपती शिवरायांना मानवंदना देत स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेच्या शिलेदारांनी गडाकडे प्रस्थान करून ही अठ्ठाविसावी मोहीम यशस्वी पार केली.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मोहिमेत मयुर मालुसरे, किशोर सावरकर,योगेश गुजर,अथर्व कापसे,पंकज सावरकर,रितेश भोसले, विशाल पवार सह स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेच्या शिलेदारांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading