स्कुटी चोरी प्रकरणी विधी संघर्षग्रस्त बालक पोलिसांच्या ताब्यात

Police4
पनवेल ( संजय कदम ) :
पनवेल शहरातील जोशी आळी परिसरातून एका अ‍ॅक्टीव्हा स्कुटी चोरी प्रकरणी विधी संघर्षग्रस्त बालकाला गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने ताब्यात घेतले आहे.
शहरातील सहयोग नगर, जोशी आळी पनवेल येथून अ‍ॅक्टीव्हा स्कुटी क्र.एमएच-46-एडब्ल्यू-1110 ही गाडी चोरी झाल्याने या चोरीचा तपास पनवेल पोलिसांसह गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल समांतर तपास करीत असताना वपोनि उमेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रवीण फडतरे, पोउपनि.अभयसिंह शिंदे, पो.हवा.सागर रसाळ, प्रशांत काटकर, निलेश पाटील, पो.ना.अजिनाथ फुंदे, पो.शि.लवकुश शिंगाडे आदींनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे अधिक शोध घेतला असताना त्यांना विधी संघर्षग्रस्त आरोपीची माहिती मिळाली त्यानुसार त्याला बारवई येथून ताब्यात घेतले असता त्याने चोरी केल्याचे अधिक तपासात निष्पन्न झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading