सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेची भररस्त्यात हत्या !

Sangita

पनवेल : 

सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेची हत्या करण्यात आल्याचा प्रकार पनवेल तालुक्यातील वलप गावाच्या परिसरात घडला आहे.
संगीता राजेंद्र आगवणे (49 रा.गणेशनगर, वलप) या आज सकाळी खाजगी शिकवणी घेवून घरी परत येत असताना आर्चित किराणा दुकानाजवळील कच्च्या रस्त्यावर त्यांचा मृतदेह त्यांच्या मुलाला आढळून आला असून कोणीतरी अज्ञात इसमाने सदर महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने, मोबाईल फोन व पर्स असा एकूण 1 लाख 95 हजार 8520 रुपये किंमतीच्या वस्तू जबरीने काढून घेण्याच्या उद्देशाने त्यांचा गळा आवळून त्यांच्या अंगावरील विविध प्रकारचे सोन्याचे दागिने जबरी चोरी करून त्यांचा खुन करून तो पसार झाला आहे.
याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून याबाबत या घटनेची माहिती मिळताच वपोनि अनिल पाटील, पो.नि.जगदीश शेलकर व पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना होवून त्यांनी अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading