3 तोळे वजनाच्या सोन्याची चेन चोरी केल्याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या पथकाने गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेतले आहे.
फिर्यादी हे सुनील देशी बार जवळील कट्ट्यावर झोपले असताना कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाच्या ज्याची किंमत 1 लाख 20 हजार रुपये इतकी असलेल्या सोन्याची दोन चैनी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची तक्रार नेरुळ पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
त्या तक्रारीच्या आधारे समांतर तपास गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे वपोनि उमेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक, गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना सदर आरोपी हा शिवाजी चौक नेरुळ परिसरात थांबला असल्याची माहिती मिळताच या पथकाने सापळा रचून आरोपी शेखर हटकर (26 रा.नेरुळ) याला ताब्यात घेतले असता त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्यातील चोरलेल्या दोन चैनी या पथकाकडे सुपूर्द केल्या आहेत.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.