सोगाव ( अब्दुल सोगावकर ) :
अलिबाग तालुक्यातील सोगांव येथील तक्षशिला बुद्धविहार येथे शुक्रवार दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी भारतरत्न, महामानव बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त मापगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विजय भगत, माजी उपसरपंच वसीम कुर, माजी सदस्या स्नेहा रुत यांनी आपल्या मित्रपरिवारासह जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सोगाव सिद्धार्थ नगर येथील बौद्ध समाजाचे दिलीप कांबळे व इतर महिला व पुरुष यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.