सोगांव येथे इफ्तार पार्टीचे आयोजन

सोगांव येथे इफ्तार पार्टीचे आयोजन

सोगांव (अब्दुल सोगावकर) :

अलिबाग तालुक्यातील सोगाव येथे सामाजिक कार्यकर्ते व मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वसीम कुर व सामाजिक कार्यकर्ते मुद्स्सर कुर यांनी मुस्लिम बांधवांसाठी पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून रविवार दि. २३ मार्च २०२५ रोजी सोगांव येथील जामा मशिदीमध्ये भव्य दावत-ए-इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.
समाजात एकोपा, सद्भावना आणि सामाजिक समरसता वाढावी यासाठी नेहमीच प्रयत्न करणारे व समाज हितासाठी नेहमीच झटणारे सामाजिक कार्यकर्ते तथा मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वसीम कुर व सामाजिक कार्यकर्ते मुद्स्सर कुर यांनी या भव्य दावत-ए-इफ्तार पार्टी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या इफ्तार पार्टी कार्यक्रमात सोगाव पंचक्रोशीतील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरवर्षी न चुकता याहीवर्षी रमजान महिन्याच्या सुरुवातीला वसीम कुर यांनी पंचक्रोशीतील बांधवांना उपवास(रोजा)सोडण्यासाठी लागणाऱ्या खजूर पॅकेट व सरबत बॉटल आदी साहित्याचे मोठ्या प्रमाणात वाटप केले आहे, याबद्दल कुर यांचे नेहमीच कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading