पनवेल तालुक्यातील तामसई येथील कु. सृष्टी राजू शिद ही उरण तालुक्यातील चिरनेर आदिवासी आश्रमाशाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकत होती. अचानक तिच्या पोटात दुखायला लागले. कु. सृष्टी आणि तिच्या मैत्रिणींनी आश्रमशाळेतील असणाऱ्या शिक्षकांना सांगितले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले. नंतर काही तासाने कु. सृष्टीला उपचारासाठी पनवेल येथे नेण्यात आले. उपचार चालू असताना मृत्यूची झुंज देत होती, शेवटी कु. सृष्टी शिदचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आणि पिडीत कुटुंबाना धक्का बसला.
आश्रमशाळेतील व्यवस्थापकीय मंडळीनी जर वेळेत कु. सृष्टीचा उपचार केला असता तर त्या चिमूकल्या मुलीचा जीव वाचला असता, असा पालकांनी आरोप करत शाळा व्यवस्थापकीय मंडळीवर गुन्हा दाखल करा. यासाठी कु. सृष्टीचे आई वडील आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन ला अनेक पत्र दिले. मात्र गुन्हा दाखल झाला नाही. शेवटी आई वडिलांनी मा. पोलीस उपायुक्त, परीमंडळ २ कार्यालयासमोर उपोषण करण्याचे पत्र दिले आणि मंगळवार (दि. ११ फेब्रुवारी) रोजी सकाळी ११ वाजता उपोषणाला सुरुवात करताच मा. सहायक पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेतली.
यावेळी आदिवासी समन्वय समिती रायगड जिल्हा अध्यक्ष, पत्रकार गणपत वारगडा, लक्ष्मण शिद, कु. सृष्टीचे आई वडील शोभा राजू शिद आणि त्यांचे नातेवाईकांसह तात्काळ उरण पोलीस स्टेशनमध्ये गेले.आणि सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास चिरनेर आदिवासी आश्रमाशाळेतील मुख्याध्यापक आप्पासाहेब मोरे, अधीक्षक सतीश मोरे, शिक्षक महादेव डोईफोडेसह इतर शिक्षक आणि स्टाफवर भारतीय न्याय सहिंता (बी एन एस) २०२३ कलम १०६(१), ३(५), अल्पवयीन न्याय (मुलाची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ कलम ७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात उरण वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ, पोलीस उप निरीक्षक संजय साबळे अधिक तपास करीत आहेत.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.