सुधाकर घारे यांच्या आरोपाचं शिवसेनेकडून खंडण, मात्र महायुतीत सर्व अलबेल आहे का..?

Karjat Shivsena
कर्जत ( गणेश पवार ) :
 पेण येथील शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात खासदार सुनील तटकरे यांचा निवडणुकीत कडेलोट होईल अशी जहरी टीका आमदार महेंद्र थोरवे यांनी केली होती. त्यानंतर कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे स्थानिक नेते सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषद घेत थोरवे यांना हत्तीच्या पायाखाली चिरडू म्हणत आक्रमक झाले.
दरम्यान थोरवे व घारे वादात आता महायुतीचे लोकसभा संभाव्य उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या खासदारकीची विकेट पडेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात निर्माण झाली असताना, मात्र सदर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे स्थानिक नेते सुधाकर घारे यांच्या आरोपांचे कर्जत – खालापूर शिवसेना शिंदे गटाच्या कर्जत येथील बाळासाहेब भवन येते पार पडलेल्या पत्रकार परिषदेतून खंडण करताना झालेला आरोप प्रत्य आरोप पाहाता, मात्र मावळ लोकसभा मतदार संघातील कर्जत – खालापूर विधानसभा मतदार संघात महायुतीमध्ये सर्व अलबेल आहे का? कि संसदरत्न खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांचे खासदारकीचे स्वप्न भंगणार ? असा प्रश्न मात्र उपस्थित होत असल्याने, संसदरत्न खासदार बारणे यांचा विजय की पराजय का खासदार बारणे यांच्या विजयी घोडदळ मध्ये महायुतीतील अंतर्गत वाद कारणीभूत ठरणार या कडे मात्र राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे .
कर्जत – खालापूर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी पेण येथील पक्षाच्या मेळाव्यात खासदार सुनील तटकरे यांचा निवडणुकीत कडेलोट होईल अशी जहरी टीका केली होती. याचे प्रति उत्तर हे दि.२४ मार्च २०२४ रोजी कर्जत थेथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंर्पक कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे स्थानिक नेते सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषद घेत थोरवे यांना हत्तीच्या पायाखाली चिरडू म्हणत आक्रमक झाले होते. त्यांच्या या वक्तव्याचे खंडण करण्यासाठी बाळासाहेब भवन कार्यालय, कर्जत येथे दि. २६ मार्च रोजी सायंकाळी ६.०० वाजता कर्जत खालापूर शिवसेनेच्या शिंदे गाटाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या पत्रकार परिषदेला शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर, विधानसभा संघटक शिवराम बदे, उप जिल्हाप्रमुख भाई गायकर,कर्जत तालुकाप्रमुख संभाजी जगताप, खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील, नगरसेवक संकेत भासे, महिला संघटक रेश्मा आंग्रे, गोविंद बैलमारे, कर्जत तालुका संघटक सुनील रसाळ, कर्जत तालुका अधिकारी अमर मिसाळ, रोहित विचारे उपतालुका प्रमुख अंकुश शेळके, मिलिंद विरले, सचिव रत्नाकर कोळंबे, सल्लागार संतोष भोईर, प्रफुल्ल म्हसे, कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे, कर्जत महिला सांघटक रेश्मा म्हात्रे यांच्या सह आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी आमदार थोरवे यांनी त्या मेळाव्यातील उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर आपल्या भाषणातून खासदार तटकरे यांची हमी कोण घेणार त्यांनी आपल्यात बद्दल केला नाही. तर त्यांचा कडेलोट होईल असा उल्लेख केला. मात्र त्या ठिकाणी पराभव असा असे म्हणायचे होते.परंतू पराभव शब्दाचा अर्थ कडेलोट असा त्यांच्या कडून झाला. असे विश्लेषण देत सुधाकर घारे यांनी मात्र त्यांचे नेते खासदार सुनिल तटकरे यांना खुश करण्यासाठी मात्र पत्रकार परिषद घेऊन आमदार थोरवे यांच्यावर बेशुट आरोप करण्याचे काम केले आहे. त्यांना ज्यांनी रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष करत मोठे केले त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांनी व भावी आमदार म्हणून मिरवणाऱ्यांनी कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात आरोप करणे योग्य नाही.
येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत आमदार थोरवे यांच्या समोर भावी आमदार म्हणवून घेणाऱ्यांनी एकदाचे लढावे. कोण कोणाचा पराभव करतो ते जनतेसमोर येईल. यापुढे त्यांनी असे प्रकार थांबवावे आम्हाला मावळ लोकसभा मतदार संघात त्यांची गरज आहे. त्या प्रमाणे त्यांना रायगड लोकसभा मतदार संघात आमची त्यांना गरज आहे. कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या मतदारसंघातील विकासकामे पाहाता खासदार बारणे यांना मोठया प्रमाणात जनता मतदान करून त्यांना निवडूण देईल. तर कर्जत तालुका अधिकारी अमर मिसाळ यांनी आमदार थोरवे यांनी खासदार सुनिल तटकरे यांना त्यांच्यात बद्दल करण्याच्या सुचना केल्या मात्र संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते व सरपंच सदस्य यांनी ही आपल्यामध्ये बद्दल करण्याची गरज असल्याचे सांगीतले, तर विधानसभा संघटक शिवराम बदे यांनी कडेलोट होईल या शब्दाचा अर्थ कडेलोट करू असा करत पत्रकार परिषद घेऊन पराचा कावळा करत हात्तीच्या पायाखाली देऊ, म्हणाऱ्यानी येणाऱ्या २०२४ विधानसभा निवडणूकीत या पक्षातून त्या पक्षातून किंवा अपक्ष उभे राहून निवडणूक लढाल. आम्ही गृहीत धरल आहे.
जर तुमच्यात प्रमाणीकपणा असेल तर महायुतीचे घटक पक्ष म्हणून महायुतीसोबत राहाल, जर तुम्ही अनाजीपंतांच्या भूमिकेत असाल तर तुम्हीच हत्तीच्या पायाखाली चिरडले जाल. असे म्हणत एक प्रकारे घारे यांना अनाजीपंतांची उपमा देत जहीरी टीका केली. तर शिवसेना शिंदे गटाच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित नेते मंडळीकडून झालेली टीका व आरोप पहाता. मात्र मावळ लोकसभा मतदार संघातील कर्जत – खालापूर विधानसभा मतदार संघात महायुतीमध्ये सर्व अलबेल आहे का? कि संसदरत्न खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांचे खासदारकीचे स्वप्न भंगणार ? असा प्रश्न मात्र उपस्थित होत असल्याने, संसदरत्न खासदार बारणे यांचा विजय की पराजय का खासदार बारणे यांच्या विजयी घोडदळ मध्ये महायुतीतील अंतर्गत वाद कारणीभूत ठरणार या कडे मात्र राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading