सुधाकर घारे यांचा अपक्ष उमेदवार म्हणून नामनिर्देशन अर्ज दाखल, घारे यांचे मोठे शक्ती प्रदर्शन, २० ते २५ हजाराचा जनसागर

Sudhakar Ghare Ab Form Submit
कर्जत ( गणेश पवार ) :
कर्जत – खालापूर विधानसभा मतदार संघात महायुती मध्ये बिघाडीचे चित्र स्पष्ट झाले असल्याने शिवसेना शिंदे गट, भाजपा व अपक्ष तसेच महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर झाल्याने महायुती व महाविकास आघाडी यांच्या मध्ये थेट लढत न होता, महायुती मधील मित्र पक्ष असलेल्या भाजपाचा उमेदावर निवडणूक लढविणार असल्याची व भाजपाने या उमेदवाराला ए.बी फॉर्म दिल्याची चर्चा सुरू असल्याने, व त्या मध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचा सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह राजीनामा देणारे सुधाकर घारे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत २५ ते ३० हजाराच्या जनसागराच्या साक्षीने आज अपक्ष नामनिर्देशन अर्ज हा कर्जत प्रांत अधिकारी यांच्या कडे सुपूर्द केला असल्याने, मात्र कर्जत – खालापूर विधानसभा मतदार संघात चौरंगी की तिरंगी हे चित्र दि. २९ अक्टोंबर नंतर स्पष्ट होणार आहे.
राज्यात विधानसभेचे बिगुल वाजले असल्याने, कर्जत – खालापूर विधानसभा मतदार संघात तापलेले राजकीय वातावरण पाहाता व महायुती मधील शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांची उमेदवारी घोषीत झाली असताना महायुतील मित्र पक्ष भाजपाचे कर्जत – खालापूर विधानसभा संर्पक प्रमुख किरण ठाकरे हे निवडणूक लढविणार असल्याची व भाजपाने या उमेदवाराला ए.बी फॉर्म दिल्याची सुरू असल्याची चर्चा व महाविकास आघाडीतील दुसरा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटातील कर्जत – खालापूर मधिल सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह सुधाकर घारे यांनी दिनांक २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पत्रकार परिषद घेत थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर करत, अपक्ष उमेदवारी लढवणार असल्याचे घोषित केले होते.
सुधाकर घारे यांनी आज दि. २५ ऑक्टोंबर रोजी साधारण २० ते २५ हजाराच्या जनसागरासह त्यांचे कार्यालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कर्जत मुख्य बाजारपेठ मार्ग ते छत्रपत्ती शिवाजी महाराज यांचे पुतळयाला पुष्पहार अर्पण करून जुनी कचरी मार्गाने कर्जत प्रशासकीय भवन अशी भव्य रॅलीचे आयोजन करत अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या कडे आपला अपक्ष उमेदवारी नामनिर्देशन अर्ज सुपूर्द केला आहे.
यानंतर कर्जत पोलीस ग्राउंड येथे सभा घेऊन कार्यकर्त्यांना सुधाकर घारे यांनी कामाला लागण्याच्या सुचना केली आहे. मात्र घारे यांनी आज आपला अपक्ष नामनिर्देशन अर्ज दाखल केल्याने, व महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नितिन सावंत हे दि.२८ ऑक्टोंबर तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे दि. २९ ऑक्टोंबर रोजी आपले नामनिर्देशन अर्ज भरणार असल्याचे जाहीर केल्याने व महायुतील मित्र पक्ष असलेल्या भाजपाचे किरण ठाकरे नामनिर्देशन अर्ज भरणार असल्याची सुरू असलेली चर्चा व त्यांनी नामनिर्देशन अर्ज कधी भरणार हे जाहीर न करता गुलदस्त्यामध्ये असल्यामुळे कर्जत – खालापूर विधानसभा मतदार संघात चौरंगी की तिरंगी लढत होणार हे चित्र दि. २९ ऑक्टोंबर रोजी स्पष्ट होणार आहे.
——————————————–
कर्जत तालुक्यात असलेली रोजगार, शिक्षण व आरोग्य विषयाची असलेली बकाल स्थिती बदलून उत्तम शिक्षण, आरोग्य सुविधा व रोजगार व्यवस्था हे आमचे मुख्य व्हीजन आहे.
…सुधाकर घारे, अपक्ष उमेदवार, कर्जत – खालापूर विधानसभा मतदार संघ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading