कर्जत/कशेळे ( मोतीराम पादीर ) :
कर्जत- खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना अतिशय बळकट होत असून पक्षाचा विस्तार गाव खेड्यांपर्यंत अतिशय जोमाने होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षापर्यंत जनसामान्यांना सहज पोहोचता यावं आणि पक्षाच्या माध्यमातून जनतेला त्यांच्या अडचणी समस्या सोडविण्यासाठी मदत व्हावी, या हेतूने पाथरज जिल्हा परिषद वार्ड मधील कशेळे येथे कार्यालयाचे उद्घाटन सुधाकर घारे यांच्या हस्ते रविवारी (दि. १) रोजी करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत,प्रदेश सरचिटणीस अशोक भोपतराव,कर्जत तालुकाध्यक्ष भगवान चंचे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ धुळे,रायगड जिल्हा सरचिटणीस दीपक श्रीखंडे,रायगड जिल्हा सहसचिव प्रकाश पालकर, कर्जत खालापूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बंधू देशमुख,कर्जत तालुका महिला राष्ट्रवादी अध्यक्ष रंजनाताई धुळे,राष्ट्रवादी डॉक्टर सेल अध्यक्ष फिजाताई तांबोळी तसेच अरुण हरपुडे, शरद तवले, नामदेव गायकवाड, कमलाकर रसाळ,चंद्रकांत मिनमीने,अर्जुन केवारी,तुकाराम पाटील,जयराम हरपुडे,निलेश कडे,संजय मिनमीने,उत्तम पाळंदे,लक्ष्मण खांडवी तसेच पाथरज जिल्हा परिषद गटातील सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————————–
सुवर्ण पदक विजेत्या माधुरी भगत यांचा सन्मान सोहळा सुधाकर घारे यांच्या हस्ते झाला साऊथ आफ्रिका येथे झालेल्या आशिया पॅसिफिक आफ्रिकन इक्विप स्पर्धेत ज्युनियर महिला ४७ कि.वजनी गटात सुवर्ण पदक प्राप्त करुन एशियन बेस्ट लिफ्टर किताब प्राप्त करून रायगड जिल्ह्याचा लौकिक वाढविल्याबद्दल कु.माधूरी ज्ञानेश्वर भगत रा. शेलू, वांगणी यांचा आज रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा आरोग्य, शिक्षण, क्रीडा सभापती सुधाकर भाऊ घारे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कर्जत येथील रॉयल गार्डन सभागृहात रविवारी दि. १ सप्टेंबर रोजी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.