मुंबई ( मिलिंद माने ) :
राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय लघु व सुषम उद्योग मंत्री व रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार नारायण तातू राणे यांच्या घराणेशाहीला कंटाळून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख आता राजीनामा देत असल्याचे राजन तेली यांनी स्पष्ट करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रवेश केला आहे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपाचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख राजन तेली यांच्या भाजपाच्या राजीनामामुळे नारायण राणे यांना मोठा धक्का बसला असून नारायण राणे यांची घराणेशाही भाजपला किती हानिकारक ठरणार आहे हे राजन तेली यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकार नमूद केले आहे. मी गेली दहा वर्ष प्रामाणिकपणे दिवस रात्र मेहनत करून सर्वांना बरोबर घेऊन सावंतवाडी मतदारसंघात पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केले. सन २०१९ ला. कणकवली विधानसभेमध्ये शिवसेनेचे सतीश यांना शिवसेनेने अधिकृत उमेदवारी देऊन आपल्या भाजपाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात उभे केले म्हणून मला एबी फॉर्म दिला होता परंतु तत्कालीन भाजपा अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील माननीय नामदार रवींद्र चव्हाण संघटन मंत्री सतीश दौड यांच्याकडून निरोप आला की शिवसेनेकडून चूक झाली असेल फ्री त्यावेळी आपण चूक करता कामा नये म्हणून मी एबी फॉर्म पक्ष नेतृत्वाच्या आदेशामुळे दिला नाही.
भाजपा पक्षात प्रवेश केलेल्या आणि कुटुंबीयांच्या अंतर्गत होत असलेला त्रास तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँक 2019 चे विधानसभा निवडणूक यामध्ये माझा पराभव करण्यासाठी पक्षांतर्गत विरोधक निर्माण करणे( यासाठी साम ,दाम, दंड ,भेद ) याचा वापर करणे पूर्वीच्या सर्व त्रासाला कंटाळून मी भाजपा पक्षात प्रवेश करून पक्ष संघटना वाढीसाठी काम केले फक्त बांदा शहरापुरता मर्यादित असलेली भाजप संपूर्ण सावंतवाडी मतदारसंघात वाढवण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन अतोनात परिश्रम केल्याचे राजन तेली यांचे म्हणणे आहे.
नारायण राणे यांची घराणेशाहीमुळे भाजपा सोडली!
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र व या लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार नारायण राणे यांचे कुटुंबीय भाजपा पक्षात दाखल होऊन आमचे खच्चीकरण करण्याचे तसेच त्यांच्यापासून दूर गेलेल्या सर्वांना त्रास देण्याचे एककलमी कार्यक्रम राबवत आहे. मी घोटगे सारख्या अत्यंत ग्रामीण भागात सामान्य कुटुंबात जन्मलो कष्टाने माजी राजकीय कारकीर्द घडवली ज्या राजकीय पक्षात गेलो तेथे शंभर टक्के प्रामाणिकपणे काम केले स्वतःच्या मेहनतीने माणसे जोडली पण एकाच कुटुंबाला एक लोकसभा दोन विधानसभा आणि त्यांच्या कलाने चालणारा तिसरा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देणे मला योग्य वाटत नाही ही घराणेशाही मला मान्य नसल्याचा सांगत त्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या नारायण राणेंवर आरोप केला आहे.