नवी दिल्ली:
भारतीय मोबाइल वापरकर्त्यांवर सध्या जगातील सर्वाधिक सायबर हल्ले होत असून, यामध्ये वैयक्तिक माहिती चोरण्यापासून आर्थिक फसवणुकीपर्यंत विविध गुन्हे घडत आहेत. ‘जेडस्केलर थ्रेटलॅब्ज २०२४ मोबाइल, आयओटी अँड ओटी थ्रेट’ या अहवालाने धोक्याचा इशारा दिला आहे.
भारत मालवेअर हल्ल्यांचे मुख्य लक्ष्य
२८% मालवेअर हल्ले भारतात: जून २०२३ ते मे २०२४ दरम्यान जगातील एकूण मोबाइल मालवेअर हल्ल्यांपैकी २८% हल्ले भारतात झाले आहेत.
बँकिंग आणि स्पायवेअर हल्ल्यांची वाढ: बँकिंग मालवेअर हल्ल्यांमध्ये २९% तर मोबाइल स्पायवेअर हल्ल्यांमध्ये १११% वाढ झाली आहे.
सायबर गुन्हेगारांचे नवे लक्ष्य
भारतीय टपाल सेवा: हल्लेखोर SMS च्या माध्यमातून वापरकर्त्यांना फिशिंग साइट्सकडे वळवून क्रेडिट कार्ड डिटेल्स चोरण्याचा प्रयत्न करत आहेत.
प्रमुख बँक ग्राहक धोक्यात: HDFC, ICICI, आणि Axis Bank ग्राहकांवर फिशिंग हल्ले वाढले आहेत.
धोकादायक अॅप्सची भर
२०० पेक्षा अधिक धोकादायक अॅप्स: Google Play Store वर २०० हून अधिक असे अॅप्स आढळले आहेत जे वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरले आहेत.
मालवेअर व स्पायवेअर म्हणजे काय?
मालवेअर: संगणक किंवा मोबाइल डिव्हाइसवर माहिती चोरण्यासाठी वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर.
स्पायवेअर: याचाच एक प्रकार, ज्याद्वारे वैयक्तिक माहिती नकळत मिळवली जाते.
भारतीय मोबाइल वापरकर्त्यांनी सावधान राहून सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे.