आजही प्रामाणिकपणा जीवंत, सापडलेला सोन्याचा दागिना केला परत

Nagothane Police
नागोठणे ( महेंद्र माने ) :
छत्रपती शिवाजी महाराज बाजार पेठेतील छोटे व्यापारी अमर अशोक भंडारे यांना दुकानात सापडलेली सोन्याचे येअररिंग मूळ मालकास परत केल्याने आजच्या युगात प्रामाणिकपणा जीवंत असल्याचे अमर भंडारे यांनी सिद्ध करून दाखविले. त्याच्या या प्रामाणिकपणाचे नागोठणे शहर व विभागातून कौतुक होत आहे.
गवळ आळीतील रहिवाशी अमर भंडारे हे छत्रपती शिवाजी महाराज बाजार पेठेतील व्यापारी संतोष कावेडिया यांच्या दुकानाबाहेर छोटेसे कटलरीचे दुकान चालवतात. त्यांना शनिवार 23 मार्च रोजी दुकानांमध्ये एक पिशवी सापडली त्यामध्ये सोन्याचे येअररिंग असल्याचे समजताच त्यामधील पावतीच्या आधारावर सदरची वस्तु बाफणा ज्वेलर्स मधून खरेदी केल्याचे समजले.ज्वेलर्समध्ये चौकशी केल्यानंतर एक मुलगी सदरील वस्तु खरेदी करून गेल्याची माहिती मिळाली. तेव्हा या आधी एक मुलगी आपल्याकडे खरेदी करण्याकरिता दुकानात आल्याचे भंडारे यांना आठवले.
सदरील वस्तु त्या मुलीची असणार व ती ते शोधत असणार असा विचार करून ती वस्तु भंडारे यांनी पोलिस ठाण्यात प्रामाणिकपणे आणून दिली. नागोठणे पोलिसांनी त्यामध्ये असलेल्या खरेदी पावतीवरून मूळ मालकाचा शोध घेतला. व गुन्हा शाखेचे पोलिस हवालदार विनोद पाटील यांनी मूळ मालक मनिषा गुप्ता हिच्याकडे संपर्क साधून पूर्ण खातरजमा केली व मनिषाचा भाऊ आकाश गुप्ता त्यांना सदरील वस्तु अमर भंडारे यांचे हस्ते सहा. पोलिस निरीक्षक हरेश काळसेकर यांच्या उपस्थितीत परत देण्यात आली.
अमर भंडारे यांनी एक सुज्ञ नागरिकाची भूमिका पार पाडत आजच्या युगात प्रामाणिकपणा जीवंत असल्याचे सिद्ध करून दाखविले. त्याच्या या प्रामाणिकपणाबद्दल पोलिस ठाण्याकडून त्याचे अभिनंदन करण्यात आले असून त्याचे नागोठणे शहर व विभागातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading