सांबरीमध्ये दहिहंडी उत्सव आनंदात साजरा

Dahi Handi Sambari
अलिबाग :
 अलिबाग तालुक्यातील सांबरीमध्ये  दहिहंडी उत्सव आनंदात पार पडला. आठवड्याभरापासुन विश्रांती घेतलेल्या पावसाने देखिल गोविंदांवर कृपा करत सकाळपासूनच दमदार हजेरी लावल्यामुळे गोविंदांमध्ये उत्साह संचारला होता.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखिल सांबरी गावातील बाळगोपाळांनी दहिहंडीचा मनसोक्त आनंद लुटला राजेंद्र चांगदेव पाटील यांच्या येथे  बांधण्यात आलेल्या मानाची हंडी थर लावुन बाळ गोपालांनी फोडली. त्यानंतर गोविंदांनी साखळी धरून ढोल-ताशाच्या गजरात 
बोल बजरंग बली की जय 
गो…विंदा… रे गोपाळा यशोदेच्या तान्ह्या बाळा | यांच्या घरात नाही पाणी घागर उताणी रे… गोपाळा || 
गो..विंदा..रे गोपाळा कृष्ण देवकीच्या बाळा |
गोविंदा… विसरले घरदंडा मुरली वाजवली | हरीने मुरली वाजवली || राधा गवळण घाबरली ||
डोईवर घागर पाझरली | राधा गवळण घाबरली ||
गो…विंदा… रे गोपाळा यशोदेच्या तान्ह्या बाळा |
चरल्या गेल्या वनाच्या ठायी | चरता चरता पडला फेच ||
आम्ही पुजू गणोबा देव | गणोबा देवाचे हेलम्बे ||
या गवळणीच्या तालावर ठेका धरत साखळी धरून प्रत्येकाच्या घराजवळून जातांना अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने तसेच स्वत:ची काळजी घेत जवळपास गावातील एकूण १८ दहीहंड्या फोडण्यात आल्या. 
सरते शेवटी सांबरीचे ग्राम दैवत श्री धावेश्वर महाराज मंदिरात शेवटची दहिहांडी फोडून सांगता करण्यात आली. या उत्सवासाठी गावातील सर्वांनीच सहभाग नोंदवून खेळी मेळीच्या वातावरणात उत्सवाचा आनंद घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading