सवादच्या प्रचारसभेत सुतारवाडी आणि नॅपकिनच्या टीकेवरून आ.भरत गोगावले आणि खा.सुनील तटकरे यांच्यात नर्मविनोद

Sunil Tatkare & Gogavale

पोलादपूर ( शैलेश पालकर ) :

पोलादपूर तालुक्यातील लोकांना ढालकाठी जवळ आणि सुतारवाडी खुप दूर आहे. अडीअडचणीच्यावेळी आमचे दरवाजे नेहमीच मदतीसाठी उघडे आहेत, अशी टीका आम्ही विरोधात असताना खा.तटकरे यांच्याविरोधात करीत होतो. पण मुठी उघडया ठेवून मदत करण्याची दानत असलेला नेता म्हणून खा.तटकरे यांनी नेहमीच दातृत्व सिध्द केले आहे, असे प्रशंसोदगार महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी सवाद येथील सभेमध्ये काढले तर खा.सुनील तटकरे यांनीदेखील त्यांच्या भाषणामध्ये, बगलेत नॅपकिन घेऊन मंत्रालयामध्ये फिरणारा आमदार म्हणून भरतशेठ गोगावले यांच्यावर अनेकदा टीका केली. मात्र, याच आ.भरतशेठ गोगावले यांनी विकासकामांचा निधी प्रचंड प्रमाणात आणून जो धडाका लावला, त्यामुळे त्यांचे भरभरून कौतुक करावे तेवढे थोडेच असल्याचे सांगून दोन्ही नेत्यांनी आपसात झालेली दिलजमाई कार्यकर्त्यांसमोर बोलताना उघड केली.

याप्रसंगी व्यासपिठावर आ. भरत गोगावले,कोकण प्रदेश युवासेना अध्यक्ष विकास गोगावले, प्रमोद घोसाळकर, अरुण चाळके, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस अपेक्षा कारेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाड विधानसभा ज्येष्ठ नेते सुभाष निकम, चंद्रकांत जाधव, महाड तालुका अध्यक्ष निलेश महाडिक, पोलादपूर तालुका अध्यक्ष विठोबा पार्टे, शिवसेना महिला संघटिका निलीमा घोसाळकर, महाड तालुका संघटिका स्वप्ना मालुसरे, सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत कळंबे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत, भाजपचे तालुका अध्यक्ष तुकाराम केसरकर, ज्येष्ठ कार्यकर्ते वाय.सी.जाधव, उमेश कालेकर, विभागप्रमुख सिध्दार्थ सकपाळ, विभागप्रमुख सयाजी मांढरे, युवा अध्यक्ष दीपक कळंबे, मंगेश चाचले, अक्षय बुडबाडकर, दिलीप गोगावले, संकेत म्हस्के, कालवली सरपंच किरण पवार, हर्षद सातपुते आदी उपस्थित होते.

याप्रसंगी खा.तटकरे यांनी, आपणावर दिवंगतांच्या विधानांच्या संदर्भातून कोणी खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत असेल, तर सत्य काय आहे ते सांगण्याची नक्की वेळ येईल, असा गर्भित इशारा देऊन गीतेंनी उपभोगाचं साधन म्हणून वापरले आम्ही जनसेवेचे काम म्हणून सत्तेकडे पाहात आहोत. आपत्कालीन मदतीसाठी दोनच पक्षाचे कार्यकर्ते लोकसेवेसाठी राबत होते भाजपही होता. कोरोना काळात आम्ही राबत होतो.महाराष्ट्राच्या विधानसभेची रंगीत तालीम लोकसभा निवडणूक आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारने ज्या योजना आणल्या आहेत.सीएए कायदा देशातील मुस्लिमांच्या विरोधात आहे हा अपप्रचार केला जात आहे. शेजारी मुस्लिम राष्ट्रात राहणाऱ्या हिंदू समाजाला देशाचं नागरिकत्व मिळण्यासाठी आहे, असे सांगून आगामी काळात तटकरे आणि गोगावले यांना महाड पोलादपूर तालुक्यांतील रोजगार, सिंचन, पर्यटन तसेच विविध प्रश्नांमध्ये हातात हात घालून जनतेची सेवा करताना पाहायला मिळेल. अशी ग्वाही देऊन खा.तटकरे यांनी जनताच आता घडयाळयाच्या चिन्हासमोरील बटन दाबून केंद्रामध्ये महायुतीचे सरकार स्थापन करून नरेंद ्रमोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यास सिध्द झालेली पाहायला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत कळंबे यांनी, पोलादपूर तालुक्यात सवाद गाव आहे पण महाड शहरालगत असल्याने या सप्तक्रोशीतील लोकांना चौऱ्यांशीचा फेरा घालून पोलादपूरला तालुक्याच्या ठिकाणी यावे लागत असल्याने सवाद येथे स्वतंत्र सभा घेतली. सप्तक्रोशीतील ग्रामस्थांनी दिवील ते हावरे हावरे ते सवाद असा फेरा मारावा लागतो, अशी विनंती माजी खासदार गीते यांच्याकडे केली. त्यांनी पण अनेक वर्षे दूर्लक्ष केले. शिवसेनेला हिंदूत्ववादी म्हटले जाते पण इथल्या दोन महिलांना सरपंच पदी बसविले.रस्त्यापाठोपाठ पाण्याची समस्या सोडविल्या आहेत, असे आवर्जून सांगताना चंद्रकांत कळंबे यांनी आ.गोगावलेंच्या प्रयत्नाने दिवीलपासून हावरे आणि सवाद ते कालवली असा नवीन रस्ता निर्माण करण्यासाठी निधी आणला असून या रस्त्याचे काम आचारसंहिता पूर्ण झाल्यानंतर होणार असल्याची माहिती दिली.

विकास गोगावले यांनी शिवसेना भाजप रिपाइं आणि मनसे कधी सोबत येणार याची वाट बघतोय, असे सांगून खा.तटकरे यांना केंद्रीय मंत्री झालेले पाहायचे आहे. शेकापक्षाच्या आ.जयंतभाई पाटील लेकीला म्हणजेच स्नेहल जगतापला विधानसभेत पाठवायचे आहे. पण जयंतभाई तुमच्या मुलाला तुम्ही जिल्हा परिषदेत पाठवू शकला नाही तर लेकीला कसं पाठवाल, अशी टीका केली. महाड एमआयडीसीमध्ये अवघड उद्योग खाते मिळाल्यानंतर गीते आले नाहीत, कधी आलेच तर एमआयडीसीतील केएसएफच्या रेस्ट हाऊसमध्ये येऊन परस्पर निघून जात असतं, त्यामुळे त्यांच्याकडे उद्योग अथवा मोठया प्रमाणात तरूणांना रोजगार मिळेल अशी मागणी करण्याची इच्छाच झाली नसल्याचे परखडपणे सांगितले.

आ.भरत गोगावले यांनी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे आहेत. ते लोकसभेवर निवडून आले म्हणून ही जागा त्यांची आहे. विकास गोगावले यांनी जागा मागितली होती. धैर्यशील पाटील यांनीदेखील जागा मागितली होती पण महायुतीचा निर्णय झाला आहे. तिन्ही पक्ष एकजुटीने सुनील तटकरे यांना निवडून देणार असल्याची ग्वाही देताना केंद्र आणि राज्यसरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी आ.गोगावले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार गीते यांचा समाचार घेताना, ज्या माणसाला आपण सहावेळा निवडून दिले हा रस्ता, येथील जनतेचे प्रश्न, पुरकाळात रस्ता पाण्याखाली जातो, ही कामे करायला कोणी त्यांचे हात बांधले?राज्यातील महायुती सरकारने केलेल्या कामांचा आढावा आणि निर्णयाची माहिती दिली. एकनाथ शिंदे यांच्या दोन रुग्णालयात उपचार करून देउ.युवकांना नोकरी धंद्यासाठी प्राधान्य देऊ. मुस्लिम बांधवांनी तटकरे साहेब युतीमध्ये आले आता काय होईल, ही चिंता करायची नाही. मुठी आवळून नाही खुल्या हाताने मत मागितली जातात जी आम्ही तुमच्याकडे मागतोय, असे सांगितले. यावेळी भोराव कालवलीचा रस्ता निगडेपर्यंत वाढवला. सवाद हावरे दिविल रस्ता में महिन्याच्या शेवटपर्यंत रस्ता पुर्ण करणार असल्याचेदेखील आ.गोगावले यांनी जाहिर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिध्दार्थ सकपाळ यांनी केले तर प्रास्ताविक वाय.सी.जाधव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading