सलमान खान हत्या कट प्रकरणात पनवेल शहर पोलिसांनी हरियाणा येथून आणखी एका आरोपीला घेतले ताब्यात

Aropi Salmankhan Prakaran
पनवेल :
सलमान खान हत्याकट प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली. दिपक हवासिंग गोगालिया उर्फ जॅानी वाल्मिकी (वय 30 रा.ग्राम तिग्रणा ठाणा, भिवानी, हरीयाणा) याला पनवेल शहर पोलीसांनी भिवानी, हरीयाणा येथून हरीयाणा पोलीसांचे मदतीने ताब्यात घेतले आहे.
सिने अभिनेते सलमान खान याला जिवे ठार मारण्याचा कट रचणार्‍या लॅारेन्स बिश्‍नोई व गोल्डी ब्रार गँग मधील साथीदार यांना पनवेल शहर पोलीस स्टेशन, नवी मूंबई पोलीस यांनी अटक केली आहे. दिपक हवासिंग गोगालिया उर्फ जॅानी वाल्मिकी याला अटक करण्यात आली. त्याने या कटात बाहेरून येणार्‍या आरोपींची राहण्याची व गून्हा करण्यासाठी वापरणार असलेल्या वाहनांची व्यवस्था करणार असलेबाबत सहभाग घेतला होता. तो व्हिडीओ कॅालद्वारे कटातील आरोपिच्या संपर्कात होता.
पोलीस उपायूक्त विवेक पानसरे यांनी त्याच्या वास्तव्याबाबत भिवानी पोलीस अधिक्षक वरूण सिंघला यांनी माहिती कळविली असता त्यांनी भिवानी क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक रविंद्र व त्यांच्या पथकाला नेमून जॅानी वाल्मिकी याला ताब्यात घेतले.
पनवेल शहर पोलीस स्टेशनचे वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक विनोद लभडे यांनी आरोपी जॅानी वाल्मिकी याला भिवानी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने 5 जून पर्यंत ट्रांझिट कस्टडी रिमांड मंजूर केला आहे. त्यानुसार पोलीसांचे पथक आरोपीस घेऊन पनवेल येथे परत येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading