जिल्ह्यात सर्पदंश सगळीकडे होत असतात, यामध्ये विंचूदंश हे विशेष असून डॉक्टरांनी सर्पदंश व विंचू दंश झालेल्या रुग्णांना उत्तम सेवा देवून त्यांची काळजी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.तसेच सर्प व विंचू दंशाने होणारे मृत्यू शून्यावर आणण्यासाठी प्रशासनाची विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक कॉन्फरन्स हॉल येथे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाट, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा विखे, पद्भूषण डॉ.हिम्मतराव बावस्कर आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले की, रायगड जिल्हा जंगळमय असून समुद्र तटी आहे. त्यातच जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे सरपटणारे प्राणी याकाळात बाहेर येवून मानवीवस्तीत येत असतात. त्यामुळे सर्पदंश व विंचूदंशाचे प्रमाण वाढत आहे. याकरिता वेगळया दिशेने संशोधन करणे गरजेचे आहे. शासनाकडून वैद्यकीय सेवेकरिता डॉक्टर घडावेत याकरिता मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात आहे. यासाठी डॉक्टरांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग जनसेवेसाठी करावा, अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. पावसाळ्यात काम करणाऱ्यांना मजूरांना मोठे गमबूट देण्यात यावेत याकरिता विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.
कार्यशाळेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.फाळके यांनी मानले. या कार्यशाळेला जिल्ह्यातील वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी तसेच डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.