PEN न्यूज ऑनलाइन टीम :
हिवाळा सुरू झाल्यानंतर सर्दी, खोकला, घशात खरखर यांसारख्या समस्या वाढू लागतात. अशावेळी सकाळी चहा ऐवजी एक कप कोमट लिंबू-लवंग पाणी पिण्याचा उपाय फायदेशीर ठरू शकतो. हा घरगुती उपाय प्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि श्वसनमार्ग साफ करण्यास मदत करतो, असे हेल्थकेअरच्या आहार तज्ज्ञ सांगतात.
लिंबामधील क जीवनसत्त्व रोगप्रतिकार शक्ती वाढवते, तर लवंगातील दाहकविरोधी गुणधर्म श्वसनमार्ग मोकळा ठेवतात. तसेच, यामुळे वजन व्यवस्थापनातही मदत मिळू शकते. चहा पेक्षा कमी कॅलरीज असलेले हे पेय, विशेषत: सर्दी आणि घसा खवखवत असताना दिवसातून दोनदा घेण्याची शिफारस केली आहे.
हे पेय तयार करण्यासाठी पाण्यात लवंग उकळवा, थंड झाल्यावर लिंबाचा रस आणि एक चमचा मध घालून प्या.
(टीप: इथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या. आम्ही याची पुष्टी करत नाही.)