बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तब्बल 25 दिवसांनंतर पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून, सरपंचाचं लोकेशन पुरवणाऱ्या एका व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. अशाप्रकारे एकूण तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असल्याचे समजते.
आरोपींची पार्श्वभूमी
26 वर्षीय सुदर्शन घुलेवर मागील 10 वर्षांत तब्बल 10 गंभीर गुन्हे दाखल आहेत, ज्यात खून, मारहाण, चोरी, आणि खंडणीचे गुन्हे आहेत. तर, सुधीर सांगळे याच्यावर दोन कोटींच्या खंडणीसाठी गुन्हा दाखल आहे. अटक केल्यानंतर पोलिस आता या आरोपींच्या सहभागाबाबत अधिक चौकशी करणार आहेत.
वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ
दरम्यान, खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणीही वाढत असल्याचं समोर आलं आहे. पवनचक्की खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांमधील संभाषणाचं मोठं प्रकरण उघड झालं आहे. विष्णू चाटेने दिलेल्या कबुलीनंतर वाल्मिकच्या भूमिकेवर संशय गडद झाला आहे.
या दोन्ही घटनांमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, तपासाला वेग आला आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.