ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी रविवारी सायंकाळी रोहा शहरात भव्य मिरवणुकीसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
या कार्यक्रमाला खा. सुनिल तटकरे, ना. अदिती तटकरे, माजी आ. अनिकेत तटकरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. समीर शेडगे, नीता हजारे, समीक्षा बामणे, महादेव साळवी, हर्षद साळवी आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
या सोहळ्यात खा. सुनिल तटकरे यांनी उत्स्फूर्त भाषणात शेडगेंचे कौतुक करत सांगितले की, “समीर शेडगे हा लढवय्या कार्यकर्ता असून त्याच्या प्रवेशाने पक्षाला नवी ऊर्जा मिळाली आहे. आमची घोडदौड आता कोणीही थांबवू शकणार नाही.” यावेळी मुस्लिम समाजातील महिलांची लक्षणीय उपस्थिती होती, ज्यामुळे शेडगे यांचा प्रवेश अधिक प्रभावी ठरल्याचे दिसून आले.
शहराच्या विकासासाठी आता सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचा विश्वास शेडगे यांनी व्यक्त केला. “तटकरे साहेबांमध्ये दैवी शक्ती आहे, आणि त्यांच्यासोबत राहून आम्ही रोह्याचा चेहरामोहरा बदलणार,” असे म्हणत त्यांनी पक्षातील कटुता दूर झाल्याचेही स्पष्ट केले. यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढून तालुका व शहरात नव्या राजकीय समीकरणांची नांदी झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.