अलिबाग मुरुडचे कार्यसम्राट आमदार महेंद्र दळवी यांनी सामान्य जनांसह जिल्ह्यातील शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध असल्याचे अभिवचन देऊन, समाज घडवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान झालाच पाहिजे, असे निक्षून सांगितले.
यावेळी अलिबाग- मुरुडला जोडणाऱ्या साळाव पुलासाठी एक कोटी एकोणचाळीस लाख रुपयांचा निधी मिळवल्याचेही जाहीर केले. येथील बोर्ली बीट विस्तार अधिकारी नरेंद्र गुरव यांच्या सेवानिवृत्ती समारंभात व्यासपीठावरुन बोलताना त्यांनी वरील विधान केले. नियत वयोमानानुसार गुरव यांचा सेवानिवृत्ती सोहळा मांडला येथील भव्य सभागृहात संपन्न झाला.
रायगड जिल्ह्यातील शिक्षक सहकारी पतपेढी अलिबागचे पॅनेल प्रमुख ,माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक ; शिक्षक परिषद या राज्यातील महत्त्वाच्या संघटनेचे कोकण विभागीय शिक्षक नेते; कनकेश्वर देवस्थानचे मुख्य विश्वस्त अशा नानाविध भूमिकांनी ते रायगड जिल्ह्याला सुपरिचित आहेत. मराठी शाळांमधील पटसंख्या वाढीच्या यशस्वी प्रयोगात त्यांचे मोठे योगदान असून, आजवर जिल्हा आणि राज्य स्तरावरील अनेक सन्मान मिळवले आहेत.
यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये आमदार महेंद्रशेठ दळवी, मुरुडचे गटविकास अधिकारी राजेंद्र खताळ, गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे आदि तालुक्यातील पावणेदोनशेहून अधिक शिक्षक, कार्यकर्ते उपस्थित होते. या नेत्रदीपक सोहळ्याचे सूत्रसंचालन जगदीश चवरकर, राजेंद्र नाईक या यांनी तर आभार प्रदर्शन शरद पाटील यांनी केले.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.