रायगड जिल्ह्यातील अलिबाग पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या चेंढरे ग्राम पंचायत हद्दीतील प्यारेलाल अँड सन्स यांच्या मैदानावर अलिबाग शहरातील जैन समाजातील महिलाना प्रोत्साहन देण्यासाठी जैन वुमेन्स प्रीमियर लीग अलिबाग स्पर्धेचे दिवस रात्र पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महिलांचे आठ संघ सहभागी झाले होतें. या स्पर्धेत पिंक फायटर संघ हा अंतिम विजेता संघ तर अलिबाग टायटन्स हा संघ उपविजेता ठरला आहे.
सदर स्पर्धेत मॅजेस्टिक वॉरियर्स, क्रिकेट क्वीन्स, अलिबाग टायटन्स, भक्ती रायडर्स, देवकी स्ट्राईकर्स, दहिराम स्ट्राईकर्स, रायझिंग स्टार, आणि पिंक पँथर्स या आठ संघानी सहभाग नोंदविला होता.
या स्पर्धेत पिंक फायटर संघ हा अंतिम विजेता संघ तर अलिबाग टायटन्स हा संघ उपविजेता ठरला असून निकिता मेहता या बेस्ट बॅट्समन आणि वूम ऑफ सिरीज ठरल्या आहेत. टीना पंकज जैन ह्या वूमन ऑफ द मॅच ठरल्या. वसदर स्पर्धात सहभाग घेतलेल्या महिल्यांनी त्यांचा अनुभव सांगताना सांगितले की, आम्हाला सांगताना गर्व होत आहे. आम्ही कधीही क्रिकेटचे साहित्य हाती घेतले नव्हते.
मात्र आम्हाला क्रिकेट खेळ कसा खेळायचा याची माहिती नसताना देखील जवळपास सत्तर ऐंशी जणी एकत्रित येऊन सहा दिवस क्रिकेट सराव केला आणि पहिल्यांदा क्रिकेटच्या मैदानात उतरले आहोत. हा खेळ आम्हाला खेळता येत नव्हता. म्हणून आम्ही गर्वाने सांगतो की आमच्या समाजातील पुरुष मंडळींनी प्रचंड मेहनत घेऊन आम्हाला या सराव दरम्यान प्रोत्साहन दिले. त्यामुळे आम्ही क्रिकेट मैदानावर खेळण्यासाठी उतरलो आहोत.
यामध्ये एक संघच विजयी होणार आहे. हार जीत न मांडता आपला संघ कशाप्रकारे जिंकण्यासाठी प्रयत्न करीत आहेत हे महत्वाचे आहे. खेळ हा एक दिवसाचा असतो. तो आनंदाने खेळावा ही आम्ही या स्पर्धेतून शिकलो आहे. भविष्यात आमच्यापैकी काहीजण पुढे जाऊन महिला क्रिकेट मध्ये अलिबाग जैन समाजाचे नाव मोठे होईल यांचा आम्हाला विश्वास आहे.
सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजेंद्र भंडारी, दिलीप भंडारी,अनिल चोपडा, दिपेश जैन नितीन जैन आकाश ओसवाल दिलीप जैन योगेश जैन दिनेश ओसवाल, श्रीकांत ओसवाल दिनेश ओसवाल, शंभू चोपडा कैलाश जैन,अंकिता जैन अनिता ओसवाल निकिता जैन चंदना जैन भक्ती ओसवाल ऋतुजा जैन खुशी जैन आदींनी परिश्रम घेतले.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.