ब्लु पँथर संघटने तर्फे पनवेल तालुक्यातील बौद्ध समजातील डॉक्टर, वकील, सरपंच, उपसरपंच तसेच आंबेडकरी चळवळीला योगदान देणारे कार्यकर्ते यांचा सन्मान करण्यात आला.
पनवेल तालक्यातील सर्व जुने नवे कार्यकर्ते ऐकत्र करून आंबेडकर चळवळ मोठी करण्याच्या उद्दिष्टाने आंबेडकर चळवलितील जेष्ठ समजसेवक मा. नरेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राज सदावर्ते व त्यांची टीम यांनी पनवेल तालुक्यातील गावी गावी जाऊन पनवेल तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी प्रत्येक गावातील प्रतिष्ठित व्यक्तीना एकत्र करून संघतनेल सामील केले आणि जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले. या संघटनेला ब्लु पँथर नाव देण्यात आले.
या संगटनेचे वैशिष्ट म्हणजे या संघटनेत कोणी अध्यक्ष नाही नाही कोनी सरचिटणीस सर्वच जन कार्यकर्ते आहेत . यामध्ये सर्व राजकीय पक्षा मध्ये काम करणारे आंबेडकरी पदाधिकारी एकत्र येऊन समजासाठी काम करतात. समजातील नामवंत व्यक्तीने समजातील व्यक्तीचा सन्मान करण्याच्या उद्दिष्टाने एक नवीन संकलपणा आमलात आणली आणि आपण आपल्या समजातील नामवंत व्यक्तीचा सन्मान करण्यात यावा म्हणुन पनवेल तालुक्यातील अनेक नामवंत व्यक्तीचा सन्मान करण्यात आला.
यामध्ये वकील – 30, डॉक्टर – 6,ग्रामपंचायत सरपंच -2, ग्रामपंचायत सदस्य -14, आंबेडकर चळवळी साठी योगदान देणारे -47 कार्यकर्ते तसेच दिवंगत आंबेडकर चळवळी साठी योगदान देणारे – 25 या सर्व बांधवांचा शाल, फुळगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अनेक मान्यवर उपस्थतीत होते या मध्ये शिरीष भटांगे , कुमार मेटोंगे , पत्रकार नंदकुमार गायकवाड, समजसेवक के. के. गायकवाड, जेष्ठ आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते नरेंद्र गायकवाड, विजय गायकवाड, महानगरपालिका जिल्हा क्षेत्र अध्यक्ष प्रभाकर कांबळे, वकील राजेश खंडागळे,ओवले ग्रामपंचायत सदस्य राज सदावर्ते, प्रवीण खंडागळे, विजय बाबरे, जयवंत बाबरे, पत्रकार – शंकर वायदंडे, पत्रकार – सुभाष वाघपंजे , मच्छिंद्र कांबळे, सचिन गायकवाड, राहुल गायकवाड, सचिन कांबळे, मंगेश गायकवाड. इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.