सन्मान उच्च शिक्षित मातब्बरांचा ! कापडे बुद्रुक येथे पोलादपूर गौरव पुरस्कार वितरण सोहळा  

Poladpur Pratistan Gaurav Sohala
पोलादपूर (शैलेश पालकर) :
उच्च शिक्षित विविध क्षेत्रांतील मातब्बरांच्या गौरवसोहळयाचे अध्यक्षस्थान केवळ नववी इयत्तेपर्यंत शिकलेल्या उद्योजकास देणाऱ्या आकार प्रतिष्ठानच्या आयोजकांनी गुणवंतांची निवड काटेकोरपणे केल्याचे दिसून येत असल्याचे उद्योजक संतोष मेढेकर यांनी प्रांजळपणे मत मांडले.
तालुक्यातील कापडे बुद्रुक येथे विविध क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांचा पोलादपूर गौरव पुरस्कार प्रदान करून रविवारी सायंकाळी शानदार गौरवसोहळा आकार प्रतिष्ठान पोलादपूर या सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित करण्यात आला.
या पुरस्कार वितरण सोहळयात उद्योजक संतोष मेढेकर, सहयोग प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष रमेश चव्हाण, दत्तात्रेय काठाळे, सेवानिवृत्त नायब तहसीलदार सुभाष जगदाळे, माजी सभापती दिलीप भागवत, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण कार्याध्यक्ष शैलेश पालकर, कोमसाप जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ, ज्येष्ठ समाजसेवक यशवंतदादा मोरे, वाकणचे नारायण साने, मोरगिरीचे सरपंच शरद जाधव, प्रमोददादा शिंदे, व सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक दत्तोपंत साळुंखे, माळी तसेच अजितकुमार वि.जंगम आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
या सोहळयामध्ये संगीतमय वातावरणात पोलादपूर तालुका आदर्श शिक्षक, शिक्षक रत्न पुरस्कार प्राथमिक विभागाचे राज्यपुरस्कार विजेते राजिप शाळा गोळेगणीचे शिक्षक सचिन दरेकर, पोलादपूर तालुका आदर्श शिक्षक, शिक्षक रत्न पुरस्कार माध्यमिक विद्यालय सवादच्या माध्यमिक शिक्षिका सुनंदा दिलीप जावळे, पोलादपूर तालुका आदर्श शेतकरी -कृषी रत्न पुरस्कार वाकणचे शेतकरी संभाजी सालेकर, पोलादपूर तालुका आदर्श साहित्य सेवक- भाषा गौरव पुरस्कार राज्य पारितोषिक विजेत्या पोलादपूरच्या अरुणा अजित भागवत, पोलादपूर तालुका आदर्श कीर्तन सेवा – प्रबोधन रत्न पुरस्कार- रायगड भूषण पुरस्कार विजेते तुर्भेतील ह.भ.प. शिवम महाराज कदम, पोलादपूर तालुका आदर्श शाळा – विशेष गुणवत्ता पुरस्कार राजिप शाळा चरई, पोलादपूर तालुका आदर्श शाळा – विशेष गुणवत्ता पुरस्कार माध्यमिक विभाग  लोहारेतील साने गुरुजी विद्यालय, पोलादपूर तालुका आदर्श खेळाडू – क्रीडा रत्न पुरस्कार -रानवडीतील श्रुती उतेकर, पोलादपूर तालुका आदर्श शासकीय अधिकारी- सेवा रत्न पुरस्कार- अनिल पवार (ग्रामसेवक) लोहारे, पोलादपूर तालुका आदर्श व्यावसायिक -उद्योग रत्न पुरस्कार कापडे फौजदारवाडीतील अशोक पवार, पोलादपूर तालुका आदर्श समाजसेवक – समाजरत्न पुरस्कार- तुर्भेतील शिवराम उतेकर या विविध क्षेत्रातील गुणवंत मान्यवरांना सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ प्रदान करून गौरविण्यात आले. पोलादपूर रत्न पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकार प्रतिष्ठानचे सहसचिव ज्ञानेश्वर उतेकर यांनी केले. यावेळी महाडचे मोरे यांचा सुश्राव्य गायन व संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
प्रतिष्ठान पोलादपूर संस्थेतर्फे अध्यक्ष अजय सलागरे व उपाध्यक्ष रामदास सकपाळ, सचिव राजाराम शेलार, सहसचिव ज्ञानेश्वर उतेकर, खजिनदार रविकांत सकपाळ,सहखजिनदार सुनील चव्हाण यांनी पोलादपूर रत्न पुरस्कार सोहळयाचे आयोजन केले. याप्रसंगी विविध कलाविष्कारांचे सादरीकरण करण्याची उपस्थितांना संधी देण्यात आल्याने आर्याज किचनच्या प्रांगणात संगीतमय संध्याकाळ यानिमित्ताने साजरी झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading